वाल्मिक कराडवर मोक्का अन् 10 मिनिटांत परळी बंद!
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला आहे. मात्र परळीत कराडच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार राडा करत परळी बंदची(closed) हाक दिली आहे.
वाल्मिक कराड याच्या समर्थनासाठी परळी शहरामध्ये जोरदार आंदोलन सुरू झालं आहे. आता कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले आहेत, तसेच यावेळी महिला देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्या असून त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आल्याने समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. कराडवर मोक्का लावल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांतच बीड जिल्ह्यातील परळीमध्ये कराडच्या कार्यकर्त्यांकडून बंदची(closed) हाक देण्यात आली आणि परळीमध्ये एकच शुकशुकाट निर्माण झाला आहे.
आज वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून करण्यात आलेल्या परळी बंदमध्ये सर्व दुकानं देखील बंद करण्यात आले. मात्र दवाखाने आणि मेडिकल सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय परळी पोलीस ठाण्याच्या बाहेर कराड समर्थकांनी ठिय्या मांडला आहे.
दरम्यान, आता वाल्मिक कराडच्या काही समर्थकांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं आहे. त्यामुळे आता परळीत वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ प्रचंड आक्रोश पाहायला मिळत आहे. मात्र आता परळीत पुढे नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
हेही वाचा :
तब्बल १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकांनी केली घोषणा
कुरुंदवाडात रिक्षामध्ये बेकायदेशीररित्या गॅस भरून देणाऱ्यावर कारवाई
महाकुंभमेळ्यात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याने केलं शाही स्नान