पैसे झाले डबल, ‘या’ शेअरने दिली छप्परफाड कमाई

ट्रायडेंट टेकलॅब्सच्या शेअर्समध्ये(stock market) गेल्या वर्षभरात लक्षणीय वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी ३५ रुपयांना असणारे हे शेअर्स आता १४५० रुपयांवर पोहोचले आहेत. शुक्रवारी, हा शेअर १४५० रुपयांवर व्यवहार करत होता. या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने वर्षभरात गुंतवणूकदारांना ३८०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

या शेअरची (stock market)वर्षभरातील कामगिरी पाहता, ५२ आठवड्यांचा उच्चांक १६७० रुपये आहे, तर ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १५७.१० रुपये आहे. २१ डिसेंबर २०२३ रोजी गुंतवणुकीसाठी खुला झालेला ट्रायडंट टेकलॅब्सचा आयपीओ २६ डिसेंबर २०२३ पर्यंत खुला होता. आयपीओमध्ये शेअरची किंमत ३५ रुपये होती. २९ डिसेंबर २०२३ रोजी हा शेअर ९८.१५ रुपयांवर लिस्ट झाला आणि अवघ्या काही दिवसात, म्हणजे १७ जानेवारी २०२४ रोजी १४५० रुपयांवर पोहोचला.

ट्रायडंट टेकलॅब्सचा आयपीओ एकूण ७६३.३ पट सबस्क्राइब झाला होता. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठीचा कोटा तब्बल १०५९.४३ पट सबस्क्राइब झाला होता.

नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स कॅटेगरीमध्ये ८५४.३७ पट आणि क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स कॅटेगरीमध्ये ११७.९१ पट सबस्क्रिप्शन मिळाले होते. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना फक्त एका लॉटसाठी बोली लावता आली. एका लॉटमध्ये ४००० शेअर्स होते. म्हणजेच, एका लॉटसाठी १,४०,००० रुपये गुंतवावे लागले.

हेही वाचा :

पवारांच्या बालेकिल्ल्याला अजितदादांचा सुरुंग

सैफ अली खानला रुग्णालयातून कधी मिळणार डिस्चार्ज? 

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्र उगवल्यानंतर या उपायांनी मनोकामना होतील पूर्ण!