मान्सूनने महाराष्ट्र व्यापला, पुढील ५ दिवस महत्त्वाचे

मान्सूनने रविवारी उर्वरित महाराष्ट्र व्यापला असून, आता संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून(rain) दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले. आज, सोमवारपासून सुरू होणाऱ्या आठवड्यामध्ये कोकण-गोवा येथे बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आठवड्यात सर्वदूर

जूनचा अखेरचा आठवडा आला, तरी पावसाने अपेक्षित वेग गाठलेला नाही. त्यामुळे मान्सून दाखल होऊनही पाऊस अनुभवण्यासाठी राज्यातील नागरिक प्रतीक्षा करीत आहेत. येत्या आठवड्यात मात्र महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पावसाळी वातावरण निर्माण होईल.

कोकण, विदर्भात तूट

एक जून ते २३ जून या कालावधीत कोकण आणि गोव्यात पावसाची नऊ टक्के तूट आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अल्पावधीत अधिक पावसाने अनुक्रमे नऊ टक्के आणि ४० टक्के अतिरिक्त पाऊस नोंदला गेला आहे. विदर्भात १६ टक्के तूट आहे. येत्या आठवड्यातील पावसाच्या व्यापकतेमुळे कोकण आणि विदर्भातील तूट कमी होण्याची शक्यता आहे. मुंबई शहरामध्ये सरासरीपेक्षा ४३, तर उपनगरांमध्ये ४६ टक्के पावसाची तूट आहे.

हेही वाचा :

जरांगे यांनी ओबीसींमध्ये बुद्धिभेदाचा प्रयत्न करू नये, हाके

जेवणानंतर गोड खायची इच्छा होत असेल तर घरीच बनवा चॉकलेट फज

आजपासून सुरूवात होणार संसदेच्या अधिवेशनाला