आईसोबत पोटच्या मुलीचं राक्षसी कृत्य! मारहाण केली, केस ओढले, चावा घेतला; हृदय पिळवटून टाकणारा VIDEO VIRAL

आई आपल्या मुलांसाठी असंख्य त्याग करते आणि त्यांच्या आवडी-निवडी (sacrifices)जपण्यासाठी सतत प्रयत्नशील राहते.खरंतर आई मुलांचे संगोपन करण्यासाठी तिचे संपूर्ण आयुष्यच अर्पण करते,मात्र आईविरुद्ध क्रुरतेचा कळस गाठणारी एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे.ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.हा व्हिडिओ पाहून अनेकांचे हृदय हेलावले असून, पोटच्या मुलीच्या अमानुष वागण्याने लोक संताप व्यक्त करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला घरातील एका बेडवर तुम्हाल दोन महिला बसलेल्या आहेत.व्हिडिओ पाहून तुम्हाला दिसून येईल व्हिडिओत दिसणाऱ्या माय-लेक आहेत.त्यानंतर पोटची मुलगी तिच्या आईला निर्दयीपणे मारहाण करताना दिसत आहे तर आई वेदनेने विव्हळत असताना दिसत(sacrifices) आहे.खरं तर त्यानंतर धक्कादायक गोष्ट म्हणजे मुलगी त्यानंतर चक्क तिच्या आईच्या पायाचा चावा घेते.सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
संपूर्ण घटना हरियाणामधील असल्याचे समजत आहे.ऐवढेच नाही तर सर्व व्हिडिओ एक्सवरील या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ शेअर केल्यानंतर कॅप्शनमध्ये संपूर्ण घटनेमध्ये नक्की काय ते सांगिलतले आहे.व्हिडिओला पाहून नेटकरी वर्गातून अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
A Daughter torturing her Mother.
— ShoneeKapoor February 27, 2025
I'm shock that – it's her own mother, NOT mother-in-law._haryanapic.twitter.com/Npv8dMka2X
एका यूजरने कमेंट केली आहे,”कारवाई केली का मुलीवर” तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे,” आपला समाज कुठे चालला आहे?” तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली,”काय(sacrifices)दिवस आले त्या माउलीवर”तर प्रत्येक यूजर्संनी कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे.धक्कादायक हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
हेही वाचा :
मोठी बातमी! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील दत्तात्रय गाडेला बेड्या; मध्यरात्रीच्या थरारानंतर अटक
1 मार्चपासून ‘या’ 3 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, जगतील राजासारखं आयुष्य
जंक फूडचा मेंदूवर होतोय गंभीर परिणाम; ५ दिवसांतच होतो ‘हा’ मोठा बदल