धक्कादायक ! प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या मुलांनाच आईनं संपवलं

संगमनेर : सध्या गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात आता प्रेमात(mother) अडथळा ठरणाऱ्या पोटच्या दोन्ही मुलांना आईनेच संपवल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोन महिन्यांपूर्वी दोघा भावंडांचा(mother) शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, हे प्रकरण संशयास्पद असल्याचा संशय गावकऱ्यांना आला होता. त्यानुसार, पोलिसांनी तपासही केला होता. त्यानंतर आता दोन महिन्यानंतर या दोन सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून नव्हे तर, घातपात असल्याचे तपासात समोर आले आहे.

यातील धक्कादायक बाब म्हणजे प्रेमात अडथळा असणाऱ्या मुलांना जन्मदात्या आईनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने शेततळ्यात ढकलून संपविल्याचे एका साक्षीदाराच्या साक्षीने उघड झाले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आईनेच प्रियकराच्या साथीने मिळून दोन मुलांची हत्या केल्याचे उघड झाले. सुमारे दोन महिन्यानंतर पोलिसांना दोन्ही मुलांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी जन्मदाती आई कविता सारंगधर पावसे आणि तिचा प्रियकर सचिन बाबाजी गाडे या दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा :

श्रद्धा कपूर राहुल मोदीशी करणार लग्न…?

१० वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची मोठी संधी

चोरी करताना पाहिले म्हणून विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून खून