क्रिकेटवरून एमएस धोनी आणि पत्नीमध्ये जुंपले भांडण; थर्ड अंपायरच्या निर्णयाने निवाडा
क्रिकेटमध्ये(cricket)स्टंपिंगबद्दल बोलताना एमएस धोनीपेक्षा चांगला कोणीही नाही. धोनीने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण 195 फलंदाजांना यष्टीचीत केले आहे, जो क्रिकेटमधील एक वेगळा विक्रम आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धोनी त्याची पत्नी साक्षी धोनीसोबत स्टंपिंगबाबत झालेल्या वादाबद्दल सांगत आहे. 2015 मध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यावरून धोनी आणि साक्षी यांच्यात वाद झाला होता.
या व्हायरल व्हिडिओमध्ये धोनी म्हणाला, आम्ही घरी 2015 चा एकदिवसीय सामना पाहत होतो, साक्षीही माझ्यासोबत होती. सहसा आम्ही दोघे क्रिकेटबद्दल(cricket) बोलत नाही. गोलंदाजाने वाइड बॉल टाकला, फलंदाज पुढे गेला आणि मैदानात अंपायरने टीव्ही रिव्ह्यूसाठी इशारा केला. तेव्हा माझी पत्नी म्हणाली, ‘हे नॉट आऊट आहे, तुम्ही पाहत राहा कारण अंपायर बॅट्समनला परत बोलावतील पण स्टंपिंग होत नाही.’
एमएस धोनीने पत्नीला समजावून सांगितले, वाईड बॉलवर स्टम्पिंग करून आऊट होऊ शकतो, पण नो बॉलवर नाही. साक्षी म्हणाली, ‘तुला काही कळत नाही, जरा थांब, पाहा थर्ड अंपायर त्याला परत बोलावेल.’ आम्ही हे संभाषण करीत असताना, फलंदाज सीमारेषेवर पोहोचला होता आणि तेव्हा साक्षी म्हणाली, नाही, पंचांना त्याला परत बोलावावे लागेल. पुढचा फलंदाज खेळायला आला तेव्हा ती म्हणाली, इथे नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे.
यावेळी उपस्थित प्रेक्षकांनीही धोनी आणि साक्षीसोबत घडलेल्या या घटनेचा आनंद घेतला आणि खूप हसले. धोनी हा यष्टिरक्षक होता ज्याने जगातील सर्वाधिक (195) फलंदाजांना यष्टिचीत केले. या यादीत कुमारा संगकारा दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याच्या नावावर एकूण 139 स्टंपिंग्ज आहेत.
सर्व फ्रँचायझींना ३१ ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करायची आहे. असे मानले जाते की CSK यावर्षी धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवेल, ज्यामुळे त्याला संघात सामील होण्याचा मार्ग मोकळा होईल. धोनीने आयपीएल २०२४ पूर्वी सीएसकेचे कर्णधारपद सोडले होते आणि संघाची कमान रुतुराज गायकवाडकडे सोपवली होती, त्यामुळे त्याच्या भविष्याबाबत अटकळ बांधली जात होती. आता धोनीने स्वतः आयपीएल २०२५ मध्ये खेळण्याचे संकेत दिले आहेत. एक खेळाडू म्हणून गेल्या काही वर्षांत जे काही क्रिकेट खेळत आहे त्याचा आनंद घ्यायचा आहे, असे त्याने म्हटले आहे.
पुढे धोनी म्हणाला, माझ्या गेल्या काही वर्षांत जे काही क्रिकेट खेळू शकलो, त्याचा आनंद घ्यायचा आहे. लहानपणी जसा संध्याकाळी चार वाजता बाहेर पडून खेळायचो, तसाच खेळाचा आनंद घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही हा खेळ व्यावसायिकपणे खेळता तेव्हा कधी कधी त्याचा आनंद घेणे कठीण होते. मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत भावना आणि वचनबद्धता गुंतलेली असते, परंतु मला पुढील काही वर्षे खेळाचा आनंद घ्यायचा आहे.
हेही वाचा :
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात महाविकास आघाडीत बंडखोरी
शरद पवार गटाचे आणखी 5 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात