मुकबधीर मुलीवर अत्याचार कर्मचा-यास आजन्म कारावास
मुकबधीर अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात वसतिगृहातील(caretaker) काळजीवाहकास धाराशिव न्यायालयाने आजन्म कारावास व 1 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विशेष म्हणजे अत्याचार झाल्यानंतर मुलीने कोणाला काही सांगितले नव्हते परंतु दामिनी पथकाच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आला आणि संशयितास कृत्याबद्दल शिक्षा झाली.
धाराशिव पोलीसांच्या दामिनी पथकाने बालहक्क (caretaker)सुरक्षा सप्ताह सुरू असताना मुकबधीर निवासी शाळेत भेट दिली हाेती. त्यावेळी इयत्ता 6 वी मधील विद्यार्थींनीने तिच्यावर वसतीगृहातील काळजीवाहकाने अत्याचार केल्याचे पथकास सांगितले.
तब्बल 43 दिवसानंतर दामिनी पथकामुळे हा गुन्हा उघडकीस आला. दरम्यान समोर आलेले पुरावे व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सुर्यवंशी(caretaker) यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपीला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा :
सांगली जिल्ह्यातील “महाराष्ट्र केसरी” सूरज निकमने गळफास घेत आयुष्य संपवलं,
या’ गोष्टींची नक्की काळजी घ्या, पावसात भिजलात तरी तुम्ही आजारी पडणार नाही
इचलकरंजी नगरीमध्ये सुप्रसिद्ध येवला पैठणीचे भव्य प्रदर्शन