विधानसभेत संजय मंडलिक कोणाचा फेडणार पैरा? मुश्रीफ की घाटगे?

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक(leaders) यांच्या पराभवाला जबाबदार आणि दोषी कोण, यावर कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू असतानाच पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) समरजितसिंह घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मंडलिकांच्या प्रचारात सक्रिय असणाऱ्या मुश्रीफ आणि घाटगे यांच्या विधानसभा निवडणुकीत कोणाचा पैरा फेडायचा, हा माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासमोर मोठा प्रश्‍न असणार आहे.

कागल तालुक्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाचा लोकसभा(leaders) निवडणुकीत जोरदार फटका बसला आहे. हाच शक्तिपीठ महामार्गाचा प्रश्‍न सत्तेत असलेल्या मुश्रीफ किंवा घाटगे यांनी राज्य किंवा केंद्र सरकारला विचारण्याएेवजी जनतेसमोर बोलून दाखवत आहेत. काहीही झाले तरी शक्तिपीठ महामार्गाला कडाडून विरोध करणे हाच दोन्ही नेत्यांच्या अजेंड्याचा विषय ठरवल्याचे दिसत आहे.

महायुती म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे वरिष्ठ नेते सांगत असले तरीही प्रत्यक्ष मैदानातील चित्र वेगळे असणार आहे. मुश्रीफ आणि घाटगे यांन आत्तापासून प्रचार यंत्रणा गतीमान केली आहे. पालकमंत्री मुश्रीफ म्हणतात काहीही झाले तरी शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा लागेल आणि मी भाजपचा नेता म्हणून नव्हे तर कागलकर म्हणून शक्तिपीठ महामार्गाला कडाडून विरोध करणार म्हणून लोकांचा विश्‍वास जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. महायुती म्हणून एकत्र आलेले मुश्रीफ, घाटगे आणि मंडलिक गट हे विधानसभा निवडणुकीत एकत्र असतीलच असे नाही.

विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ आणि घाटगे यांनी माजी खासदार संजय मंडलिक यांना मदत केली म्हणतात. त्यामुळे गटा-तटाचे राजकारण असणाऱ्या कागल तालुक्यात मंडलिक पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासोबत राहणार की श्री घाटगे यांच्यासोबत जाणार याची चर्चा सुरू आहे. माजी खासदार मंडलिक यांनी मुश्रीफ किंवा घाटगे यांच्यापैकी एकाला जरी पाठिंबा दिला तर दुसऱ्या गटाचे कार्यकर्ते नाराज होणार आहेत.

महाविकास आघाडीकडून माजी आमदार संजय घाटगे किंवा गोकुळचे संचालक अंबरिष घाटगे रिंगणात असू शकतील, हे मुश्रीफ आणि घाटगे यांना विसरून चालणार नाही. कागलमधून महायुतीला महाविकास आघाडी जोरदार टक्कर देईल, असे वातावरण लोकसभा निवडणुकीत निर्माण झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत कागलमधून महाविकास आघाडीला मिळालेली कमी मते दखल घेण्यासारखी आहेत. नेत्यांच्याच कागल शहरातही मंडलिक यांना खूपच कमी मतदान झाले आहे. हाच पॅटर्न विधानसभेत राहू नये, यासाठीच मुश्रीफ आणि घाटगे यांनी गावा-गावांत जाऊन लोकांशी चर्चा करत आहेत. यातूनच दोन्ही नेत्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्याचे धोरण स्वीकारले असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा :

वाढदिवसाच्या मध्यरात्री PUBG च्या नादात 17 वर्षीय मुलाचा मृत्यू

बर्ड फ्लूची वेगळीच केस आली समोर! जगभरात चिंता वाढली

‘बाईचं मन कुणा कळलं नाही गं…’ स्वप्नील जोशीच्या आगामी चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित