कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात महाविकास आघाडीत बंडखोरी

शिरोळ : शिरोळ तालुक्यात महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून(political articles) झालेल्या रस्सीखेचच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरीची घोषणा केली. यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे संकेत मिळत आहेत.

महाविकास आघाडीतून(political articles) दत्त उद्योगसमूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांना अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. उल्हास पाटील आणि गणपतराव पाटील यांच्यात महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळावी यासाठी रस्सीखेच सुरू होती, परंतु गणपतराव पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतरही कार्यकर्त्यांच्या आग्रहावर उल्हास पाटील यांनी अपक्ष अर्ज भरून आघाडीसाठी अडचण निर्माण केली आहे.

साध्या पद्धतीने आणि मोजक्या कार्यकर्त्यांसह अर्ज दाखल करताना पाटील यांनी स्पष्ट केले की, “समोर कोणीही असो, मला काही फरक पडत नाही; कार्यकर्त्यांच्या आग्रहावर मी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. उल्हास पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा मिळेल का, या प्रश्नावर त्यांनी राज्यभरात राजकीय उलथापालथ सुरू असल्याचे सांगितले आणि त्यावर सध्या काहीही सांगता येणार नाही, असे संकेत दिले. यामुळे आगामी निवडणुकीत शेतकरी संघटनेचा आधार मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, गणपतराव पाटील यांनीही उल्हास पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांचा पाठिंबा मिळावा अशी विनंती केली होती. मात्र, पाटील यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांचा निर्णय हा त्यांच्यासाठी अंतिम आहे, त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी धनाजीराव जगदाळे, सलीम मुल्ला, रावसाहेब माने, विकास पाटील, उज्वला पाटील आणि अमोल हिरेमठ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्रात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महायुतीचा भाग आहेत. नवाब मलिक यांना तिकीट देण्यास भाजपने विरोध केला होता. मात्र, नवाब मलिक यांनी कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे स्पष्ट केले होते. अशातच आता नवाब मलिक यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा :

अर्जुन कपूरने ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनदरम्यान ब्रेकअपची केली कबुली

शरद पवार गटाचे आणखी 5 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस