आजपासून नवरात्रीला सुरुवात, जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त व पूजेची पद्धत

हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक सण म्हणजे शारदीय नवरात्री (Navratri)महोत्सव. देशभरात मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो. दरवर्षी नवरात्रीची स्थापना अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते. या काळात नऊ दिवस दुर्गेच्या नऊ विविध रुपांची पूजा केली जाते. देवीच्या नऊ रुपांना प्रसन्न करण्यासाठी पूजा, गरबा, कन्यापूजा, जागरता आदी नऊ दिवस केले जातात.

आज 3 ऑक्टोबरपासून नवरात्रीला(Navratri) सुरुवात होत आहे. अश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होत असल्याने याला शारदीय नवरात्री असे देखील म्हटले जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एका शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते. घटस्थापनेला घरोघरी घट बसवला जातो.आज घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता आणि पूजेची वेळ कोणती याबाबत जाणून घेऊयात.

नवरात्रीत कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त आज 3 ऑक्टोबरला म्हणजेच आज सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी सुरू झाला असून आणि तो 7 वाजून 22 मिनिटांपर्यंत असेल. घटस्थापनेसाठी अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 46 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत असेल.

नवरात्री उत्सवापूर्वी घरातील साफसफाई व्यवस्थित करून घ्यावी. त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठून स्नान करुन स्वच्छ वस्त्र परिधान करा. मंदिर स्वच्छ करुन गंगाजल शिंपडून शुद्ध करा. उत्तर किंवा ईशान्य दिशेला चौकट व त्यावर कापड ठेवून देवीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा. त्याचबरोबर कलश स्थापनेसाठी एक मातीचे भांडे घ्या, त्यानंतर त्यात धान्य घाला. नंतर तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि गंगाजल टाकावे. कलशावर धागा बांधून त्यावर स्वस्तिक बनवावे.

तसेच कलशात अक्षता, सुपारी आणि नाणे ठेवा. नंतर कलशावर चुनरी बांधून नारळ ठेवा. विधीनुसार देवीची पूजा करावी. सुपारी, फळे आणि मिठाई अर्पण करा. दुर्गा सप्तशती पाठ करा. शेवटी आरती करून प्रसाद वाटा.

पूजा कोणत्या दिवशी होणार?
3 ऑक्टोबर, गुरुवार – माता शैलपुत्रीची पूजा
4 ऑक्टोबर शुक्रवार – ब्रह्मचारिणी मातेची पूजा.
5 ऑक्टोबर शनिवार – चंद्रघंटा मातेची पूजा
6 ऑक्टोबर रविवार – कुष्मांडा मातेचे पूजन
7 ऑक्टोबर सोमवार – आई स्कंदमातेची पूजा
8 ऑक्टोबर मंगळवार – कात्यायनी मातेची पूजा
9 ऑक्टोबर बुधवार – माँ कालरात्रीची पूजा
10 ऑक्टोबर गुरुवार – सिद्धिदात्री मातेची पूजा
11 ऑक्टोबर शुक्रवार – महागौरी मातेची पूजा
12 ऑक्टोबर शनिवार – विजयादशमी (दसरा)

हेही वाचा :

शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू

Bigg Boss Marathi च्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धक घराबाहेर; व्हायरल व्हिडीओने चाहत्यांमध्ये उत्सुकता

स्वतःशी लग्न केलेल्या कुबराने संपवले जीवन: समाजात खळबळ