नवऱ्याशी भांडण, रेल्वे स्टेशनवर भेट, मृतदेहाचे दोन ट्रेनमध्ये 6 तुकडे

8 जूनला उज्जैनवरुन रवाना झालेल्या दोन ट्रेन्समध्ये एका महिलेच्या मृतदेहाचे 6 तुकडे(train pass) मिळाले होते. आरोपीला शोधून काढण आव्हान होतं. अखेर पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आलय. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केलीय. त्याच्यावर महिलेच्या हत्येचा आरोप आहे.

रतलाम जिल्ह्यात राहणारी मीराबेन 6 जूनला बिलपांक(train pass) भागातून गायब झाली होती. तीच नवऱ्यासोबत भांडण झालं होतं. त्यानंतर ती घर सोडून निघाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीराबेन तिच्या माहेरी मथुराला जाण्यासाठी निघाली होती. उज्जैन रेलवे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर तिची ओळख कमलेश नावाच्या व्यक्ती बरोबर झाली. मीराबेन एकटी आहे हे पाहून कमलेशने तिला सहानुभूती दाखवली. तिच्याशी बोलला.

माझ्या घरी येऊन तुम्ही आराम करु शकता असं त्याने सांगितलं. मीराबेन कमलेशच्या बोलण्यात फसली. त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याच्या घरी गेली. कमलेशने तिच्या जेवणात गुंगीच्या गोळ्या मिसळल्या होत्या. त्यामुळे मीराबेनची शुद्ध हरपत चालली होती. कमलेशने त्या स्थितीत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मीराबेन पूर्णपणे बेशुद्ध झाली नव्हती. त्यामुळे तिने कमलेशच्या लैंगिक जबरदस्तीला विरोध करण्यास सुरुवात केली.

कमलेशला याचा राग आला. त्याने मीराबेनच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यामुळे मीराबेनचा मृत्यू झाला. मीराबेनच्या मृत्यूनंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावायची ठरवलं. त्याने बाजारातून चाकू विकत घेतला व मृतदेहाचे 6 तुकडे केले. ते तुकडे त्याने बॅगेत भरले. ती बॅग घेऊन तो उज्जैन रेल्वे स्टेशनवर आला.

त्याने एक बॅग इंदोर डेमू ट्रेनमध्ये ठेवली. त्यानंतर दुसरी बॅग ऋषिकेशला जाणाऱ्या योग नगरी एक्सप्रेसमध्ये ठेवली व आरोपी घरी आला. आरोपीने खूप सफाईदारपणे गुन्हा केला. पण एका चुकीमुळे तो पकडला गेला. त्याने मीराबेनच्या मोबाईलमध्ये आपलं सीम कार्ड टाकलं. मोबाइल नंबर ट्रॅक करुन आरोपीला पोलिसांनी रतलाम येथून अटक केली. मीराबेनच्या हत्येच रहस्य स्वत: आरोपीच्या पत्नीने पोलिसांसमोर सांगितलं. सध्या पोलीस आरोपीच्या पत्नीची चौकशी करत आहेत.

हेही वाचा :

इतिहासात पहिल्यांदा लोकसभा अध्यक्षपदासाठी होणार निवडणूक

सहलीचा आनंद जीवावर बेतला; बसच्या जोरदार धडकेत तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू

टीम इंडियाला थेट फायनलचं तिकीट मिळणार? समोर आली मोठी अपडेट