राष्ट्रवादी-भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, प्रकरण थेट पोलिस आयुक्तांकडे; कारण काय तर…

पंचवटी : सध्या निवडणुकीचे वातावरण (political)असल्याने सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यात मतदारांना भुलवण्यासाठी काही उमेदवारांकडून पैसे वाटप केले जात असल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. त्यातच आता नाशिकच्या पूर्व विधानसभा मतदारसंघात पैसे वाटत असल्याच्या संशयावरून भाजप कार्यकर्त्यांनी एका संशयिताला पकडले. नंतर उमेदवार गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांच्या वाहनावर हल्ला केल्याने गुरूवारी पंचवटीत राष्ट्रवादी व भाजप आमन-सामने आली.

राष्ट्रवादी(political) आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, समाधान न झाल्याने गीते यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी निघून गेले. मात्र, याबाबत दोन्ही गटाकडून पोलीस ठाण्यात कुठलीच तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

पंचवटी परिसरातील त्रिकोणी बंगला परिसरात काल दुपारी बारा साडेबारा वाजेच्या सुमारास काही कार्यकर्ते पैसे वाटत असल्याच्या संशयावरून महायुतीचे उमेदवार राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले. मात्र, यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी संबंधित कार्यकर्ता आमचा नसल्याचे सांगितले. यावेळी दोन्ही गटात बाचाबाची झाल्याने काही काळ तणाव पसरला होता.

यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, गणेश गीते यांचे समाधान न झाल्याने त्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडे रवाना झाले. तर काही वेळात राहुल ढिकले हे देखील पोलीस ठाण्यात पोहचत त्यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

दरम्यानच्या काळात दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गीते पैसे वाटत असल्याचे तर गिते यांच्या कार्यकर्त्यांनी गोकुळ गिते यांची गाडी फोडल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केल्याने दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्याकडे धाव घेतल्याने या पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी जमली होती, यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

हेही वाचा :

सचिन तेंडुलकरचे टीम इंडियात होणार पुनरागमन?

शाळकरी विद्यार्थ्यांना या महिन्यात सलग 4 दिवस सुट्ट्या मिळणार, कारण..

क्रिकेटविश्वात खळबळ! दिग्गज खेळाडूची कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती