एनडीए सरकारचा नवा संकल्प…..!
एनडीए सरकारचा नवा संकल्प आणि अर्थसंकल्प(Budget) ह्याची महत्त्वाची विषयं आहेत. ह्या संकल्पात विविध क्षेत्रांच्या विकासाच्या मागण्या, गरीबी मुक्तीच्या प्रयत्नांची वाट, अर्थव्यवस्थेतील सुसंघटितता व संरक्षण, विभागीय संवाद संरक्षण व विस्तार, तंत्रनेतृत्वाच्या नव्याने विकास आणि परिपक्वता, निवडणूकीच्या तंत्राच्या सुधारणा, आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थांचे विस्तार, वैद्यकीय आणि तांत्रिक सेवांचे विस्तार, वातावरणाच्या संरक्षणाचे प्रयत्न, आणि आपल्या देशात अगाडीचे तंत्रनेतृत्व ह्याचा पाठपुरावा करावा असे म्हणता येते.
आज देशात गरीब अधिक गरीब, तर श्रीमंत अधिक श्रीमंत होताना दिसत आहेत, तर भ्रष्टाचारी लोक मोकाट फिरताना दिसत आहेत. तेव्हा हे चित्र बदलणे गरजेचे आहे. देशातील गरीब जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल, तर त्या दृष्टीने अर्थमंत्र्यांना तरतुदी कराव्या लागतील. आपला देश तरुणांचा देश किंवा दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या बँक खात्यावर अनुदान येत्या आठवड्यात जमा होणार अशा घोषणाबाजी न करता सरकारने कृती करणे आवश्यक आहे. आपल्या शेतीप्रधान देशात आजही शेतकऱ्यांना आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या वेशीवर जावे लागते. हे थांबणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने शेतकरी राजाला आधार द्यावा लागेल. कारण आजही शेती हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे हे विसरून चालणार नाही.
हेही वाचा :
ज्येष्ठ कवी साहित्यिक आर.एम. पाटील यांचे निधन
टीम इंडिया T20 WORLD CUP फायनल , यंदा डोळ्यात अश्रू हवेत पण आनंदाचे!
विधान परिषदेसाठी भाजपने पाठवली 10 नावे, आज किंवा उद्या होणार अंतिम निर्णय.