नीरज चोप्राने मोडला ऑलिम्पिकचा रेकॉर्ड; पाहा डायमंड लीगमधील बेस्ट थ्रो VIDEO
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पॅरिस ऑलिम्पिक(Olympic) 2024 स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून दिले होते. अशात नीरज पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसला. नीरजने लौजान डायमंड लीग 2024 स्पर्धेत चमकदार कामगिरी करत थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केलेला रेकॉर्ड देखील तोडला.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये(Olympic) नीरजने 89.45 मीटर भालाफेक करून रौप्यपदक जिंकले होते, परंतु दुखापतग्रस्त असतानाही डायमंड लीगमध्ये त्याने स्वत:चा विक्रम मोडला आहे. त्याच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. नीरजने मोसमातील सर्वोत्तम थ्रो करत डायमंड लीगमध्ये दुसरे स्थान निश्चित केले आहे.
नीरज चोप्राने डायमंड लीगमध्ये सहाव्या प्रयत्नात आपला सर्वोत्तम थ्रो केला. मात्र, तो 90 मीटरचा टप्पा गाठू शकला नाही आणि त्याचा वैयक्तिक विक्रमही तोडू शकला नाही. नीरज चोप्राच्या कारकिर्दीतील त्याचा सर्वोत्तम थ्रो हा 89.94 आहे. त्याने डायमंड लीगमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमधील त्याचा विक्रम मोडला.
या स्पर्धेत ग्रेनेडाच्या पीटर अँडरसनने 90.61 मीटर भालाफेक करून पहिले स्थान पटकावले. तर, जर्मनीचा ज्युलियन वेबर 87.08 मीटर भालाफेक करत तिसऱ्या स्थानावर आहे. तर, भारताचा नीरज चोप्रा याने दुसरे स्थान निश्चित केले आहे.
डायमंड लीगमधील नीरज चोप्राचे थ्रो
पहिला फेक – 82.10 मीटर
दुसरी थ्रो – 83.21 मीटर
तिसरा थ्रो – 83.13 मीटर
चौथा थ्रो – 83.34 मीटर
पाचवा थ्रो – 85.58 मीटर
सहावा थ्रो – 89.49 मीटर
दरम्यान, डायमंड लीगमध्ये अद्याप चौथी फेरी बाकी आहे. ही फेरी आता 5 सप्टेंबर रोजी झुरिचमध्ये होणार असून झुरिच फेरीनंतर गुणांच्या आधारे टॉप-6 मध्ये असलेल्या खेळाडूंमध्ये अंतिम सामना होईल. डायमंड लीगचा अंतिम सामना 13-14 सप्टेंबर रोजी ब्रुसेल्समध्ये खेळवला जाईल. यापैकी एका तारखेला भालाफेकचा अंतिम सामनाही खेळवला जाईल.
हेही वाचा :
आनंदवार्ता! सोनं तब्बल ‘इतक्या’ हजारांनी घसरलं
शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा: शंका आणि भाजपाची उपरोधिक प्रतिक्रिया
महाराष्ट्र नक्की हे काय घडतय? अनाथाश्रमातील तरुणींना वेश्याव्यवसायात ढकललं