आता ४ वर्षाच्या ग्रॅज्युएशननंतर थेट देता येणार NET ची परीक्षा; UGC चा नवीन नियम

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) NET (ugc net)संदर्भात मोठा निर्णय घेतलाय. चार वर्षांची पदवी (FYUP) घेणारे विद्यार्थी आता थेट UGC NET ची परीक्षा देऊ शकतात आणि PhD करू शकतात. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) हा निर्णय घेतलाय. JRF सह किंवा त्याशिवाय पीएचडी करण्यासाठी ४ वर्षांच्या अंडरग्रॅजुएट प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के गुण किंवा समतुल्य ग्रेड मिळालेली असावी असं UGC ने म्हटलंय.

सध्याच्या प्रणालीमध्ये (ugc net)राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (NET), विद्यार्थ्यांना केवळ ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. नवीन नियमांनुसार आता चार वर्षांची पदवी असलेले विद्यार्थीही या परीक्षेला बसू शकतात. UGC चे अध्यक्ष प्रोफेसर एम जगदीश कुमार यांच्या मते, जे विद्यार्थी चार वर्षांचा अंडरग्रॅजुएट प्रोग्राम (FYUP) पूर्ण करतात आणि पदवी प्राप्त करतात ते थेट पीएचडी करण्यासाठी पात्र मानले जाणार आहेत, तसेच ते हे विद्यार्थी नेट परीक्षाही देऊ शकतात.

मात्र यासाठी यूजीसीने काही अटीही ठेवल्यात. ज्या विद्यार्थ्यांनी FYUP पूर्ण केले आहे किंवा ८ सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर पदवीचे शिक्षण घेत आहेत ते या नवीन प्रणालीनुसार पात्र असतील. चार वर्षांची पदवी पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के गुण असणं आवश्यक आहे. गुणांऐवजी ग्रेड देण्याची पद्धत असून तेथे ७५ टक्के गुणांच्या बरोबरीचा ग्रेड असावेत. SC, ST, OBC, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये काही सूट दिली जाणार आहे.

हेही वाचा :

माझा ‘तो’ प्लॅन यशस्वी झाला,  शरद पवारांनी सगळंच सांगितलं!

आता फक्त ३९९! लोकसभा निवडणुकीत भाजपने उघडलं खातं

‘सूरतला गेल्यावर ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर’, एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट