Fasttag च्या नियमांमध्ये नवीन बदल…

तुम्ही फास्टॅग वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आता (changes)फास्टॅगच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेत. फास्टॅग बॅलन्स व्हॅलिडेशनमध्ये दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने फास्टॅग बॅलन्स व्हॅलिडेशनशी संबंधित नियमात बदल केलाय. आता तुम्हाला तुमच्या फास्टॅगसाठी शेवटच्या क्षणी रिचार्ज करता येणार नाहीये. कारण ते ब्लॅकलिस्टमध्ये असणार आहे. जेव्हा टोलवरील फास्टॅग रीडर एरर कोड-176 दाखवला तर फास्टॅगद्वारे टोल पेमेंट स्वीकारले जाणार नाही.

FASTag चा नवीन वेलिडेशन नियम 17 फेब्रुवारी 2025 पासून लागू झालेत. या नवीन नियमासाठी NPCI ने मागील महिन्यात एक परिपत्रक जारी केले होते. यानुसार सर्व व्यवहार वाचक, वेळ आणि टॅगच्या कमी शिल्लक/ब्लॅकलिस्टिंगच्या तारखेच्या आधारे प्रमाणित केले जाणार. रीडर रीडच्या 60 मिनिटे आधी आणि रीडर रीडच्या 10 मिनिटे नंतर अॅक्टिव्ह न केलेल्या टॅग्जवर केलेले व्यवहार कोड 176 वापरून नाकारले जाणार (changes)आहेत.
Bank Deposit Rule: बँक बुडाली तरी पैसे राहतील सुरक्षित, ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी सरकार घेणार मोठा निर्णय ब्लॅकलिस्टिंग अनेक कारणांमुळे केले जाऊ शकते. नवीन नियमांनुसार तुमच्या फास्टॅगमध्ये कमी बॅलन्स असणार आहे. पेमेंट करण्यास विलंब झाला असेल किंवा फास्टॅग ब्लॅकलिस्ट केला असेल तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. दरम्यान फास्टॉग कशामुळे ब्लॅकलिस्ट केला जाईल ते पाहूया. कमी बॅलन्स, केवायसी अपडेट केलेले नसेल, आरटीओ रेकॉर्डनुसार वाहनांची माहिती उपलब्ध नसेल तर ब्लॅकलिस्टिंग केलं जातं.
जर फास्टॅग हॉटलिस्टेड असेल किंवा एक्सेप्शन लिस्ट असेल तर त्या वाहनाला ७० मिनिटांचा वेळ मिळणार आहे. जर टॅग ६० मिनिटांपेक्षा जास्त काळ हॉटलिस्ट/ एक्सेप्शन (changes)लिस्ट असेल आणि रीडर रीडच्या टाईमपेक्षा १० मिनिटे जास्त काळ त्या लिस्टमध्ये राहिला तरच FASTag नाकारला जाणार आहे.कॉल तुमच्या FASTag मध्ये पुरेशी शिल्लक नसेल किंवा कोणत्याही कारणास्तव पेमेंटला उशीर झाला तसेच तुमचा FASTag ब्लॅकलिस्ट झाला असेल, तर तुम्हाला दंड भरावा लागेल. म्हणून तुमच्या फास्टॅगमध्ये नेहमी पुरेसा बॅलन्स ठेवावा लागेल आणि वेळेवर पेमेंट करावे लागेल.