ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नवीन नियमावली जाहीर!

केंद्र सरकारने ‘ओव्हर द टॉप’ प्लॅटफॉर्मसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे.माहिती(platforms) आणि प्रसारण मंत्रालयाने वयानुसार कार्यक्रमांचे वर्गीकरण करणे आणि कायद्याने प्रतिबंधित असलेले कार्यक्रम प्रसारित न करण्याचे निर्देश दिले आहेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह विनोदांमुळे वाद निर्माण झाल्यानंतर, सरकारने हे पाऊल उचलले आहे.नियमावलीनुसार, ओटीटी प्लॅटफॉर्मने कायद्याने प्रतिबंधित असलेले कोणतेही कार्यक्रम प्रसारित करू नयेत. तसेच, वयावर आधारित कार्यक्रमांचे वर्गीकरण करावे. ‘ए’ श्रेणीतील कार्यक्रमांसाठी पालक नियंत्रण यंत्रणा लागू करावी, जेणेकरून मुलांना असे कार्यक्रम पाहण्यापासून रोखता येईल.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे की, “कार्यक्रम प्रसारित करताना आयटी नियम-2021 अंतर्गत निर्धारित आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. आवश्यक ती काळजी (platforms) घेऊन विवेकबुद्धी वापरावी.”संसद सदस्य, कायदेशीर संस्था आणि नागरिकांकडून ओटीटी प्लॅटफॉर्मवरील काही कार्यक्रमांविषयी तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन, कोणताही कार्यक्रम प्रसारित करताना विद्यमान कायद्यांचे आणि आयटी नियम, 2021 चे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आचारसंहितेनुसार, वयानुरूप कार्यक्रमांच्या वर्गीकरणाचे कठोर पालन करणे आवश्यक असल्याचेही मंत्रालयाने नियमावलीत म्हटले आहे.

‘इंडियाज गॉट लेटेंट’ वरील आक्षेप
एका यूट्यूब चॅनेलवरील ‘इंडियाज गॉट लेटेंट’ (platforms) या कार्यक्रमात आई-वडिलांसंदर्भात करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे टीका झाल्यानंतर, सोशल मीडियावरही नियंत्रण असावे, अशी मागणी पुढे आली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे.

हेही वाचा :

वीज ग्राहकांना शॉक! ‘इतक्या’ टक्के दरवाढीची शक्यता

जीवे मारण्याच्या धमकीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “डान्सबार बंद केल्यावर… “

सौरव गांगुलीवर येणार बायोपिक, ‘हा’ अभिनेता साकारणार ‘दादा’ची भूमिका!