एसटी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम, महामंडळाचं कडक परिपत्रक जारी

एसटी(ST employees) बसमधील चालक किंवा वाहकाच्या ओळखीने एखादे पत्र, औषध किंवा जेवणाचा डबा पाठवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता असे करणे महागात पडू शकते. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे.

कर्मचाऱ्यांसाठी सूचना
एसटी कर्मचाऱ्यांवर(ST employees) प्रवाशांचा खूप विश्वास आहे. त्यांच्याकडे दिलेली वस्तू हमखास सांगितलेल्या व्यक्तीकडे सुरक्षितपणे जाते, अशी खात्री देणाऱ्याला असते. पण, आता प्रवाशांकडून परस्पर पार्सल, वस्तू स्वीकारणे किंवा त्यांची ने-आण करणे एसटी कर्मचाऱ्यांना शक्य होणार नाही.
नवीन नियम
एसटी प्रशासनाने पार्सल, वस्तूची ने-आण करण्यासाठी एका खासगी कंपनीला टेंडर दिले आहे. त्यामुळे, प्रवाशांना एखादी वस्तू पाठवायची असेल, तर ती त्यांनी या कंपनीमार्फतच पाठवावी.
कर्मचारी परस्पर पार्सल नेताना आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल, असे आदेश परिवहन महामंडळाकडून काढण्यात आले आहेत.
बसस्थानकावर पार्सल कार्यालय:
बसस्थानकावर पार्सल कार्यालय सुरू आहे. येथून मिळणारी पार्सल वाहकांनी काळजीपूर्वक न्यावीत, असे आदेश काढण्यात आले आहेत.
हेही वाचा :
‘…म्हणून लहान मुलांमधील राग वाढतोय’; पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी
देवेंद्र फडणवीसांचा पहिला धक्का; राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीतून एकनाथ शिंदेंना वगळलं
मारुतीची 8 सीटर कार, भन्नाट फिचर्स, दमदार इंजिन अन् डिस्काउंट तब्बल 3.15 लाखांचा