CM पदाच्या चर्चेत नवा ट्विस्ट! भाजपाच्या ‘या’ आमदाराच्या नावाची अचानक चर्चा

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर भाजपाचाच(politcis) मुख्यमंत्री होणार हे अधोरेखित झालं आहे. मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र या घडामोडी घडत असतानाच एकनाथ शिंदे यांनी गुगली टाकत त्यांच्या गावी निघून गेले आहेत. यातच आता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव मुख्यमंत्रि‍पदासाठी(politcis) अचानक पुढे आलं होतं.

त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. त्यामुळे मोहोळ यांनी स्वतःच ट्विट करत या चर्चांना फुलस्टॉप दिला. यानंतर तरी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा थांबतील असे वाटले होते. पंरतु, या चर्चांमध्ये आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. मुरलीधर मोहोळ नाही तर आता भाजपाचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचं नाव पुढं आलं आहे.

हेही वाचा :

मुख्यमंत्री ठरत नसतानाच आता उपमुख्यमंत्रिपदासाठी समोर आली ‘ही’ नावं

महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना झटका; एलपीजी सिलिंडर महागला

अर्रर्र! भर रस्त्यात विद्यार्थीनींमध्ये जोरदार राडा; एकमेकींना धु, धु धुतले, VIDEO व्हायरल