पुढील 5 दिवस असे असणार पावसाचे वातावरण
मागील गेल्या दोन दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी (places)मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई तर एका दिवसातच अति मुसळधार पाऊस पडला आणि शाळा कॉलेजला देखील सुट्टी देण्यात आली. हवामान विभाग देखील दररोज पावसाबद्दलच्या अंदाज व्यक्त करत असतात. अशातच आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजेच 10 जुलै रोजी पावसाचा जोर कायम राहील. तर गुरुवारपासून पाऊस काही ठिकाणी कमी होणार असल्याचे सांगितलेले आहे.
त्याचप्रमाणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणातही आज अनेक ठिकाणी पाऊस कायम राहणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे या विभागांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. त्याचप्रमाणे ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस आज होणार आहे. त्यामुळे या ठिकाणांना येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे. या ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट या विभागांना देण्यात आलेला आहे.
तसेच सांगली, संभाजीनगर, नाशिक, जळगाव,(places) नंदुरबार, धुळे, सोलापूर या जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे विदर्भ आणि मराठवाड्यात देखील काही ठिकाणी आज जोरदार पाऊस बरसणार आहे .त्यामुळे या भागांना येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे.
जोर कमी होणार आहे. तरी देखील कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्याचप्रमाणे इतर काही जिल्ह्यांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
गुरुवारपासून मात्र राज्यातील काही (places)ठिकाणचा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. तरी देखील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात घाटात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे शनिवारी कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस वाढणार आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे.
हेही वाचा :
महिन्याभराच्या विश्रांतीनंतर सोन्याच्या दाराला पुन्हा झळाळी!
मोदींची पुतीन यांच्याशी चर्चा; बाँबच्या आवाजात शांतता अशक्य
गौतम गंभीर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटचे मुख्य प्रशिक्षक