फक्त लाल, हिरवाच नाही तर Packaged Food वर असतात ५ वेगवेगळ्या रंगाचे निशाण, काय असतो अर्थ?

भारतात दोन पद्धतीचा आहार लोकं घेत असतात. यामध्ये शाकाहारी आणि मासांहारी असा पर्यायत असतात.(packaged) पण काही लोक मांसाहारी नाहीत तरी ते अंडी खातात, तर आता बरेच लोक पूर्णपणे व्हेगन झाले आहेत – म्हणजे दूध नाही, तूप नाही, अंडी नाही, फक्त पूर्णपणे वनस्पती-आधारित आहार आहे.म्हणूनच, आपण जे काही खातो त्याबद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक झाले आहे. अशाप्रकारच्या सगळ्या पदार्थांचे निशाण पॅकेज फूडवर असतात. लाल हा मांसाहारासाठी तर हिरवा हा रंग शाकाहारी पदार्थासाठी असतो. पण कधी कधी पिवळा, निळा किंवा काळा रंग देखील असतो. या रंगाचे अर्थ काय?

‘या’ रंगाचे अर्थ काय?
हे रंग केवळ डिझाइनचा भाग नाहीत, तर तुमच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाची माहिती देतात. या रंगांचा अर्थ काय आहे तर त्यावरुन तुमचा आहार नेमका कसा आहे हे कळते. जसे की,

हिरवे चिन्ह हे सूचित करते की उत्पादन पूर्णपणे शाकाहारी आहे. म्हणजेच, त्यात कोणतेही मांस, अंडी किंवा इतर प्राणी उत्पादने नाहीत.लाल चिन्ह हे सूचित करते की हे उत्पादन मांसाहारी आहे. जर तुम्ही शाकाहारी असाल तर याकडे विशेष लक्ष द्या.

आतापर्यंत बहुतेक लोक फक्त हे दोन रंग ओळखतात, परंतु माहिती इथेच संपत नाही.
आता इतर रंगांचा अर्थ जाणून घ्यानिळा रंग हे सांगतो की हे उत्पादन औषधाशी संबंधित आहे. (packaged)याचा अर्थ असा की ते वैद्यकीय स्थितीसाठी वापरले जाऊ शकते आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते वापरू नका.

पिवळा रंग पॅकेज फूडवर असते कारण की,उत्पादनात अंडी आहे. बरेच लोक अंडी खात नाहीत, अशा लोकांसाठी ही माहिती खूप महत्वाची आहे.काळा रंग सांगतो की, जर अन्नाच्या पॅकेटवर काळे डाग असेल तर ते सूचित करते की त्या उत्पादनात बरीच रसायने आहेत. हे चव वाढवण्यासाठी, रंग देण्यासाठी किंवा बराच काळ खराब होऊ नये म्हणून जोडले जातात, परंतु मोठ्या प्रमाणात ते आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.
तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की काळ्या डाग असलेल्या उत्पादनांचे जास्त सेवन केल्याने पचनसंस्थेवर, यकृतावर आणि मूत्रपिंडांवर परिणाम होऊ शकतो. (packaged)आहारात त्यांचा बराच काळ समावेश केल्याने आजारांचा धोका अनेक पटीने वाढू शकतो.

हेही वाचा :