दररोज आपण दोन वेळा दात घासतो. मात्र अनेकदा दात घासताना (teeth)आपल्या हिरड्यांमधून रक्तस्राव होण्याचा धोकाही निर्माण होतो. कदाचित तुम्हालाही दात घासताना असा त्रास होत असेल. परंतु अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. पण तुम्ही दुर्लक्षित करत असलेली ही गोष्ट अनेक गंभीर आजारांचं कारण बनू शकते हे तुम्हाला माहितीये का?

दात घासताना कधीतरी हिरड्यांमधून रक्तस्राव होणं हे धोकादायक मानलं जातल नाही. मात्र जर ही समस्या सतत होत असेल तर हे तुमच्या हिरड्यांसोबत संपूर्ण शरीरासाठी घातक आहे. आजच्या या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी ज्या हिरड्यांमधून येणाऱ्या रक्तस्रावाच कारण ठरतं.
हिरड्यांची सूज
हिरड्यांना सूज येण्याच्या समस्येने हिरड्यांमधून रक्तस्त्राव होऊ शकतो. या स्थितीत, हिरड्यांमध्ये सूज आणि इन्फेक्शन अशी लक्षणं दिसून येतात. (teeth)जी दातांवर जमा झालेल्या प्लेक आणि बॅक्टेरियामुळे होतात. दात घासतेवेळी सूज आणि रक्तस्त्राव ही त्याची सुरुवातीची लक्षणे आहेत. जर त्यावर वेळेवर उपचार केले नाहीत तर ते खूप गंभीर होऊ शकतं.
पेरिओडोंटायटीस
कालांतराने आणि उपचारांशिवाय हिरड्यांना आलेली सूज पेरिओडोंटायटीसमध्ये बदलू शकते. हे हिरड्या आणि जबड्याच्या हाडांवर परिणाम करतं. यामध्ये तुमचे दात कमकुवत होऊ लागतात. (teeth)यामध्ये देखील तुमच्या हिरड्यांमधून सतत रक्त येणं, तोंडाची दुर्गंधी येणं, दात सैल होणं अशी लक्षणं दिसू शकतात.
हार्मोनल बदल
हार्मोन्समध्ये होणारे बदल हे देखील हिरड्यांमधून होणाऱ्या रक्तस्रावाला कारणीभूत ठरतात. हा त्रास अधिकतर महिलांमध्ये दिसून येतो. महिलांमध्ये गर्भधारणेदरम्यान, मासिक पाळी दरम्यान किंवा रजोनिवृत्ती दरम्यान होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे हिरड्यांना सूज येऊ शकते. परिणामी त्यांमधून रक्तस्त्राव होऊ शकतो.
जीवनसत्त्वाची कमतरता
अनेकांना याची कल्पना नसते, मात्र शरीरातील जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हिरड्यांमधून रक्तस्राव होत असतो. यासाठी व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के जबाबदार ठरतात. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा आजार होऊ शकतो, ज्यामध्ये हिरड्या कमकुवत होतात आणि वारंवार रक्तस्त्राव होतो.
हेही वाचा :
पवारांमुळे मोदी तुरूंगात जाता जाता वाचले; राऊतांच्या खळबळजनक दाव्यानं राजकारण पेटणार
पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी!
नव्या सरन्यायाधीशांचा पहिला निर्णय; नारायण राणेंना मोठा झटका