आता जमिन मोजणी होणार तासात; नागरिकांना मोठा दिलासा

पुणे जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयात जमीन(land) मोजणीसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या मोठी आहे. मनुष्यबळाअभावी प्रलंबित अर्जांची संख्या वाढत होती. मात्र, आता ‘रोव्हर’ या आधुनिक उपकरणामुळे कमी वेळेत आणि अचूक जमीनमोजणी होत असल्याने शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

अनियमित शुल्क भरल्यास मोजणीसाठी तीन महिने लागायचे. आता साधे शुल्क भरणाऱ्यांना तीन महिने, तर तातडीच्या मोजणीसाठी एक महिना लागत आहे.

नियमित: एक किंवा समानधारकाच्या एक सर्व्हे क्र., गट क्र., पोट हिस्सा, नगर भूमापन क्र., अंतिम प्लॉट क्र., मंजूर रेखांकनातील एका भूखंडातील दोन हेक्टर मर्यादेपर्यंत ₹2,000 शुल्क आकारण्यात येते. तर त्याच एक सर्व्हे क्र., गट क्र., पोट हिस्सा, नगर भूमापन क्र., अंतिम प्लॉट क्र., मंजूर रेखांकनातील नमूद केलेल्या मर्यादेपुढील उर्वरित प्रत्येक दोन हेक्टर क्षेत्रासाठी किंवा त्याच भागास ₹1,000 शुल्क असते.

तातडीची मोजणी: एक किंवा समानधारकाच्या एक सर्व्हे क्र., गट क्र., पोट हिस्सा, नगर भूमापन क्र., अंतिम प्लॉट क्र., मंजूर रेखांकनातील एका भूखंडातील(land) दोन हेक्टर मर्यादेपर्यंत ₹8,000 शुल्क आकारण्यात येते. तर त्याच एक सर्व्हे क्र., गट क्र., पोट हिस्सा, नगर भूमापन क्र., अंतिम प्लॉट क्र., मंजूर रेखांकनातील नमूद केलेल्या मर्यादेपुढील उर्वरित प्रत्येक दोन हेक्टर क्षेत्रासाठी किंवा त्याचा भागास ₹4,000 शुल्क असते.

महापालिका, नगरपालिका हद्दीत नियमित मोजणीसाठी वरील प्रमाणानुसार ₹3,000 आणि ₹1,500; तर तातडीच्या मोजणीसाठी ₹12,000 व ₹6,000 इतके शुल्क आकारले जाते.

रोव्हर मुळे काय फायदा :
जिल्ह्यात १२८ कॉर्स रोव्हरद्वारे मोजणी
करण्यात येत आहे. त्यामुळे १ हेक्टर
क्षेत्राची मोजणी केवळ ६० मिनिटांत
होते. अचूक आणि झटपट मोजणी या
यंत्राद्वारे होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा
त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा :

वीज ग्राहकांना शॉक! ‘इतक्या’ टक्के दरवाढीची शक्यता

जीवे मारण्याच्या धमकीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “डान्सबार बंद केल्यावर… “

सौरव गांगुलीवर येणार बायोपिक, ‘हा’ अभिनेता साकारणार ‘दादा’ची भूमिका!