आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही
भारतात वाहन चालवण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. वाहन परिवहन (transportation) विभागातर्फे ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते. यासाठी जवळच्या आरटीओमध्ये तुम्हाला अर्ज सादर करून लायसन्ससाठी अप्लाय करावे लागते. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज केल्यानंतर लायसन्स हातात मिळेपर्यंत बराच काळ जातो. मात्र आता नव्या नियमानुसार हे लायसन्स तुम्हाला लवकर मिळवता येणार आहे. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.
कोणत्याही राज्यात सुरक्षित प्रवास करायचा असल्यास तुमच्याकडे कायदेशीररित्या ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आधी जवळच्या आरटीओमध्ये (transportation) वाहनाचे सर्व कागदपत्रे आणि अर्ज सादर करावे लागत होते. तसेच ड्रायव्हिंग परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स दिले जात होते. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची ही सर्व प्रक्रिया आरटीओमार्फत केली जात होती. मात्र आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यांसंबधीची प्रक्रिया आणखी सोपी केली आहे.
येत्या १ जूनपासून लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला आरटीओमध्ये न जाता तुम्ही घेत असलेल्या ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्थामध्ये ड्रायव्हिंग टेस्ट देऊन लायसन्स मिळवू शकता. यासाठी ठरावीक संस्थाना रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी नवे नियम काय आहेत?
1) ड्रायव्हिंग करणारा प्रशिक्षक हा किमान १२ वी उत्तीर्ण असावा.
2) ड्रायव्हिंग करत असलेल्या प्रशिक्षकाला पाच वर्षाचा अनुभव असणे महत्वाचे आहे.
3) हलक्या वाहनांसाठी ४ आठवडे प्रशिक्षण देण्यात येईल. तर अवजड वाहनांसाठी ६ आठवडे प्रशिक्षण देण्यात येईल.
4) लायसन्स काढण्यासाठी लागणारा प्रक्रिया काळ कमी करण्यात आला आहे.
5) वाहनाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी https://parivahan.gov.in/. या संकेतस्थळाला भेट द्या.
6) ड्रायव्हिंग टेस्ट आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी आरटीओत जाण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :
नागरिकांना दिलासा! सोन्याच्या किंमती घसरल्या
नागरिकांना दिलासा! सोन्याच्या किंमती घसरल्या
निर्यातबंदी हटवल्यानंतर 45 हजार टन कांद्याची निर्यात