आता केवळ 10 मिनिटांत घरी येणार Vivo चे स्मार्टफोन्स

तुम्ही ऑनलाईन कोणतीही वस्तू ऑर्डर केली तर इंस्टंट डिलीव्हरी अ‍ॅपद्वारे तुम्हाला केवळ 10 मिनिटांत डिलीव्हरी(Delivery) मिळते. झेप्टो, ब्लिंकीट, फ्लिपकार्ट मिनिट्स हे अ‍ॅप्स तुम्हाला केवळ 10 मिनिटांत तुमच्या सामानाची डिलीव्हरी देतात. तुम्ही देखील या अ‍ॅप्सवरून तुमचं सामान ऑर्डर करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला 10 मिनिटांत नवाकोरा Vivo स्मार्टफोन देखील मिळणार आहे. इंस्टंट डिलीव्हरी अ‍ॅप झेप्टोने Vivo सोबत हातमिळवणी केली असून आता तुम्हाला 10 मिनिटांत स्मार्टफोन देखील डिलीव्हर केला जाणार आहे.

आपल्या ग्राहकांना घरपोच आणि जलद स्मार्टफोनची डिलीव्हरी(Delivery) करता यावी, यासाठी स्मार्टफोन कंपनी Vivo ने झेप्टोसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आता तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी Vivo स्टोअरमध्ये किंवा कोणत्याही दुकानात जाण्याची गरज नाही. तुम्ही केवळ घरी बसून स्मार्टफोन ऑर्डर करायचा आहे आणि 10 मिनिटांत तुमच्या स्मार्टफोनची डिलीव्हरी केली जाणार आहे.

आता झटपट डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर निवडक Vivo स्मार्टफोन्सची ऑर्डर देऊ शकतात. ऑर्डर केल्यापासून 10 मिनिटांपेक्षा कमी वेळेत हँडसेट वितरित केला जाणार असल्याचा दावा दोन्ही कंपन्यांनी केला आहे. या नवीन सेवेमुळे झेप्टोचा विस्तार आणखी वाढण्याची शक्यता आहे. Zepto ॲप किंवा वेबसाइटद्वारे Vivo स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना प्रास्ताविक ऑफर म्हणून 5,000 रुपयांपर्यंत सूटही दिली जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला डिस्काऊंट ऑफरसह केवळ 10 मिनीटांत तुमच्या स्मार्टफोनची डिलीव्हरी(Delivery) केली जाणार आहे.

Vivo आणि Zepto ने केली हातमिळवणी
Vivo ने क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे स्मार्टफोन विकण्यासाठी Zepto सोबत केलेली भागीदारी जाहीर करणारी एक प्रेस रिलीज शेअर केले आहे. Vivo Y18i आणि Vivo Y29 5G सध्या दिल्ली NCR आणि बेंगळुरूसह निवडक शहरांमध्ये घरोघरी डिलीव्हरीसाठी झटपट वितरण प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध आहेत. Zepto ने Vivo चे नवीनतम मॉडेल्स ऑफर करण्याची पुष्टी देखील केली आहे. त्यामुळे तुम्ही लेटेस्ट स्मार्टफोन देखील Zepto वरून ऑर्डर करू शकता.

Vivo Y29 5G 4GB RAM + 128GB व्हेरिअंट 13,999 रुपयांच्या किंमतीसह सूचीबद्ध आहे. तर, Vivo Y18i ची 4GB RAM + 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 7,999 रुपये आहे. झेप्टोचा दावा आहे की ऑर्डर मिळाल्यानंतर 10 मिनिटांच्या आत Vivo स्मार्टफोन्स वितरित केले जातात. प्रास्ताविक ऑफर म्हणून, कंपनी ICICI क्रेडिट कार्डद्वारे 5,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मोबाइल फोनच्या खरेदीवर 5,000 रुपयांपर्यंत सूट देखील देत आहे. कंपनीने सांगितलं आहे की, ही ऑफर मर्यादित वेळेसाठी उपलब्ध आहे. पेटीएम, ॲमेझॉन पे, क्रेडिट आणि इतर सारख्या मोबाइल वॉलेटद्वारे डिव्हाइस खरेदी करताना ग्राहक सवलत मिळवू शकतात.

माय ऑर्डर्स विभागाला भेट देऊन ग्राहक ॲप किंवा वेबसाइटद्वारे Vivo डिव्हाईसच्या झेप्टो ऑर्डर ट्रॅक करू शकतात. झेप्टो अलीकडच्या काही महिन्यांत आपल्या प्लॅटफॉर्मवर विविध वस्तू सादर करत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, कंपनीने एनसीआर, मुंबई, चेन्नई आणि बेंगळुरू यासह काही निवडक भारतीय शहरांमध्ये काही कीबोर्ड आणि माऊस विकण्यासाठी Asus सोबत सहयोगाची घोषणा केली होती. त्यानंतर आता कंपनीने Vivo सोबत भागिदारी जाहीर केली आहे. Zepto चा मोठा प्रतिस्पर्धी, Blinkit, iPhone, Samsung Galaxy S24 सिरीज, PlayStation 5 आणि सोन्या-चांदीची नाणी डिलिव्हरी करत ​​आहे.

हेही वाचा :

माघी गणेश जयंतीला जुळून आला शिव योग; वृषभसह ‘या’ 5 राशींवर बाप्पा होणार प्रसन्न

‘दोन्ही शिवसेना जोडण्याची वेळ आली आहे…’;शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक विधान

अर्थसंकल्पाआधी शेअर बाजार सुसाट, सेन्सेक्स आणि निफ्टीची सकारात्मक सुरूवात