मधुचंद्राच्या रात्री नव्या नवरीने गुपचूप नणदेच्या खोलीत घुसून असं कांड केलं की…नवरदेवावर रडण्याची वेळ

धूमधडाक्यात लग्न करुन नवरदेव नवरीला घेऊन घरी आला. सासरकडच्यांनी (fan)नववधूच जोरदार स्वागत केलं. पण नवरीच्या डोक्यात काय चाललं आहे? हे कोणालाच माहित नव्हतं. मधुचंद्राच्या रात्री नवरदेव नववधूची वाट पाहत होता. त्यावेळी नवरी काहीतरी कारण काढून नणदेच्या खोलीत गेली. त्यानंतर पुन्हा नवऱ्याजवळ आली. दुसऱ्यादिवशी सकाळी नवरीमुलगी बेडरुममध्ये नव्हती. सासरकडची मंडळी तिला शोधू लागले. नंतर समजलं की, नवरीमुलगी सगळे दागिने आणि कॅश घेऊन पसार झालीय.

नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांनी लगेच पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस आता फरार नवरीचा शोध घेत आहेत. उत्तर प्रदेशच्या महराजगंज येथील घुघली पोलीस ठाणे क्षेत्रातील ही घटना आहे. रामपुर बल्डीहा येथे राहणाऱ्या मनीषच लग्न कोठीभार येथे राहणाऱ्या युवतीसोबत 7 फेब्रुवारीला झालं. 10 फेब्रुवारीला (fan)नवरी सासरी आली. तिचं इथे जोरदार स्वागत झालं. मधुचंद्राच्या रात्री नवरीने नवऱ्याला सांगितलं की, मी जरा नणदेला भेटून येते.
थोड्यावेळाने ती नणदेच्या खोलीतून बाहेर आली. दुसऱ्यादिवशी नवरा नववधूला शोधत होता. ती खोलीतही नव्हती आणि घरातही. त्याने कुटुंबियांना नवरीला कुठे पाहिलं का? म्हणून विचारलं. सगळेच नव्या नवरीचा शोध घेऊ लागले. त्यावेळी समजलं की, नवरी घरातून कॅश आणि दागिने घेऊन पळालीय. इतकच नाही, नणदेचे दागिने घेऊनही ती पसार झालीहे सर्व घडल्यानंतर नवरदेवाच्या घरच्यानी नवरी मुलीच्या माहेरी फोन केला. (fan)पण माहेरच्यांना सुद्धा या बद्दल काही माहित नव्हतं. पीडित पतीने नवरीच्या कुटुंबियांवर सुद्धा ते या सगळ्यामध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा :
प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अल्लाहबादियाला अणखी एक मोठा धक्का
मुलं रात्री 2 वाजता उठतात आणि आई-वडिलांना…कपिल शर्माचं ‘ते’ विधान चर्चेत!
व्हॉट्सअॅपमध्ये जबरदस्त फीचरची एंट्री; इंस्टाग्राम सारखं म्युझिक टूल कसं वापराल?