“एक १५० ची तर दुसरी २०० ची..” विदेशी महिलांविषयी तरुणाने केलेल्या ‘त्या’ विधानावरुन नेटीझन्स संतापले

“अतिथी देवो भव” हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. इथे परदेशी पाहुण्यांना(the guest) देवा समान मानले जाते. मात्र भारतात असे काही लोक आहेत जे परदेशी पर्यटकांबरोबर चुकीच्या पद्धतीने वागताना दिसतात.त्यांच्यामुळे संपूर्ण देशाची लाज जाते. राजस्थानच्या जयपूरमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. जिथे एका व्यक्ती परदेशी पर्यटकांविषयी हिंदीमध्ये अपमानस्पद गोष्टी बोलत होता. इतकेच नाही तर त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन तो सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र या व्हिडीओवर आता नेटीझन्सनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली आहे.

इंस्टाग्रामवर @guru__brand0000 नावाच्या अकाउंटवरुन अशाच प्रकारचे काही व्हिडिओ शेअर करण्यात आले आहे, जे पाहून अनेकांनी या व्यक्तीवर कारवाईची मागणी केली आहे, या व्हिडिओंमध्ये ती व्यक्ती महिला पर्यटकांविषयी अपमानास्पद गोष्टी बोलत आहे. यातील एका व्हिडीओमध्ये तर ती सर्व विदेशी महिलांची हिंदीत किंमत सांगत आहेत, पण हिंदीत बोलत असल्यामुळे पर्यटकांना काहीच समजत नाही.

हेही वाचा :

रेशन दुकानदारांचे कमिशन वाढवणार, खा. उदयनराजे

 मान्सूनने महाराष्ट्र व्यापला, पुढील ५ दिवस महत्त्वाचे

जरांगे यांनी ओबीसींमध्ये बुद्धिभेदाचा प्रयत्न करू नये, हाके