तरच 2100 रुपये मिळणार?’; लाडक्या बहीणींनो ‘या’ 6 गोष्टी लगेच चेक करा

महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे’(immediately) 2100 रुपये कधी मिळणार, याची राज्यभरातील महिलांना प्रतीक्षा लागली आहे. महायुतीच्या विजयात गेमचेंजर ठरलेल्या या योजनेबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली आहे. काल सोमवारी हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला, त्यावेळी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट दिलंय. अधिवशेनाच्या पहिल्यात दिवशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनासठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये.

लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद झाल्याने आता डिसेंबरचा हप्ता लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. जुलैपासून नोव्हेंबर पर्यंत, 5 महिन्यांचे एकूण 7500 रुपये आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागली होती. त्यामुळे सरकारने महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आधीच दिला होता.

2100 रुपये कधी मिळणार?

राज्यात पुन्हा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी आता हे 2100 रुपये कधी जमा होणार, त्याची वाट बघत आहेत. ही योजना सुरूच राहणार (immediately) असून कधीही बंद होणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. लाडक्या बहीणींना योजनेचे पैसे आता थेट पुढच्या वर्षीच मिळण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी सरकारकडून योजनेसाठी सादर केलेल्या अर्जांची पुन्हा तपासणी केली जाऊ शकते.यामध्ये ज्या महिला अपात्र आढळतील, त्यांचे अर्ज रद्द केले जातील.

लाडकी बहीण योजनेसाठीची पात्रता-

-21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार
-ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही
-ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर सोडून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील
-कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी तत्त्वावर नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही
-ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही
-संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक(immediately) लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही
-ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील लोक कर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही

हेही वाचा :

थंडी परतणार! येत्या 24 तासात महाराष्ट्रातील वातावरण बदलणार

एक नाही तर तब्बल 9 आयपीओ खुले होणार; पुढील आठवड्यात कमाईची मोठी संधी!

‘विरोधी पक्षाचा पूर्ण सफाया, ६५ वर्षांत असं कधीच घडलं नाही…’, मविआ नेत्याचे सूचक वक्तव्य