कोल्हापूर जिल्ह्याला उद्या ‘ऑरेंज अलर्ट’ नागरिकांना सावधानतेचा इशारा

भारतीय हवामान वेधशाळेने कोल्हापूर जिल्ह्यासाठी 21 ते 25 जुलैपर्यंत मोठ्या(today prediction)प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. 22 जुलै करिता ‘रेड’ तर 23 जुलै करिता ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. भारतीय हवामान वेधशाळेने कोल्हापूर जिल्ह्यासाठी 21 ते 25 जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. 22 जुलै करिता ‘रेड’ तर 23 जुलै करिता ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असं आवाहन शासन आणि प्रशासनाकडून करण्यात आलंय.

नद्या इशारा पातळीपर्यंत पोहचण्याची शक्यता

जिल्ह्यातील सर्वच डोंगराळ भागामध्ये म्हणजेच चंदगड, आजरा, राधानगरी, शाहुवाडी, पन्हाळा, गगनबावडा व भुदरगड या ठिकाणी 22 जुलैला सकाळी 8 वाजेपर्यंत 150 ते 200 मिमी किंवा त्यापेक्षाही जास्त पाऊस झालेला आहे. जिल्ह्यातील करवीर, कागल, हातकणंगले व शिरोळ या तालुक्यांमध्येही 80 ते 125 मिमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे पंचगंगा, दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा व वेदगंगा या नद्या आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इशारा पातळीपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

पाणी पातळी वाढून धोका पातळीस पोहचण्याची शक्यता

वेधशाळेने दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार वरील सर्व नद्यांच्या (today prediction) पाणी पातळीत वाढ संभवत असून पाणी पातळीमध्ये 5 ते 6 फूटांची वाढ होवून दि. 23 जुलै रोजी सकाळी 10 वा. पर्यंत ही पाणी पातळी धोका पातळीस पोहचण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, नागरिकांनी यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावं

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याने डोंगराळ भागात भूस्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना तात्काळ पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या घरांची पडझड अशा घटना संभवत असल्याने (today prediction)नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केलंय.

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, सांगली-कोल्हापूरला थोडासा दिलासा

कोल्हापुरातील पंचगंगा नदी इशारा पातळीजवळ पोहोचलेली आहे, धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. तिकडे कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने सांगली-कोल्हापूरला थोडा दिलासा मिळालेला आहे

हेही वाचा :

‘या’ भागात हवामान विभागाकडून यलो अलर्ट

मोदी सरकारचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला; कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार?

अजितदादांचा फैसला काय; NDA मध्ये राहणार की काकांच्या गोटात जाणार?