संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संताप

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास तीन महिने पूर्ण होत आहेत. (photos)या हत्या प्रकरणांमध्ये माणुसकीला काळीमा फासलाय, अशी संतोष देशमुख यांच्या हत्यावेळीचे काही फोटो समोर आलेत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मारेकर्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून आरोपींनी त्यांचा छळ करताना आणि मारहाण करत असल्याचे फोटो समोर आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय. संतोष देशमुख हत्या, खंडणी व अट्रोसिटी या तीन गुन्ह्यांचा तपास करून सीआयडीच्या विशेष तपास पथकाने दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
यासोबत पुरावे म्हणून देशमुख यांना आरोपींनी मारहाण करतानाचे, (photos) विवस्त्र करतानाचे आणि अन्य घृणास्पद कृत्य करतानाचा व्हिडिओ केला. तपास यंत्रणांनी या व्हिडिओचे स्क्रीन शॉट काढून त्याची फॉरेन्सिक तपासणी केली व हे फोटो चार्जशीट सोबत पुरावे म्हणून जोडले. सदर फोटो समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषन विभाग यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. तपासाचा भाग असलेले काही फोटो प्रसारित झाले आहेत. सदरील फोटो हे मन (photos)विचलित करणारे आहेत. त्यामुळे व्हायरल फोटोंवरून समाज माध्यमांवर जनतेच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. “सदर प्रकरण हे आता न्यायप्रविष्ट असून सदर फोटो हे न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे जनतेने कायदा हातात घेऊ नये” असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी यांनी केले आहे.
हेही वाचा :
ज्याची भीती होती तेच झालं, बाबा वेंगांची पहिली भविष्यवाणी झाली खरी
सोशल मीडियावर तरुणीशी फ्लर्ट करतोय आर.माधवन?
महिला दिनी लाडक्या बहिणींना खुशखबर! ८ तारखेला ३००० रुपये देणार