संतापजनक: रुग्णालयाच्या आवारात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक संतापजनक घटना घडलीय. (investigation)येथील रुग्णालयाच्या प्रांगणात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडलीय. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला, त्यानंतर पोलीस अधिकारी एफएसएल टीमसह घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केलाय. येथील महात्मा गांधी रुग्णालयात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडलीय.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि एफएसएल पथकांना तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे. पीडित मुलीने सफाई कर्मचाऱ्यांवर सामूहिक (investigation)बलात्काराचा आरोप केलाय. जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात ही घटना घडली असून या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट पसरलीय. अमानवीय कृत्य करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची माहिती स्थानिकांनी दिलीय.
या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासन खडबडून जागे झाले असून तपास सुरू केलाय. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन आरोपींना अटक केलीय. तर तिसऱ्या आरोपीचा(investigation) शोध सुरू आहे. या घटनेने जोधपूरच नाही तर संपूर्ण देश हादरलाय. रुग्णालयासारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ठिकाणी अशा घटना घडल्याने समाजाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.
हेही वाचा:
कोल्हापुरात पावसाची मुसंडी: नदी आणि धरणांमध्ये पाण्याची पातळी वाढली
स्कॅमरचा नवा कारनामा: सरन्यायाधीशांच्या नावाने पैसे मागितले; सायबर पोलिसांनी उचलली कारवाई
उठताना आणि बसताना वारंवार पाठदुखी-कंबरदुखी जाणवते? मग, ‘या’ योगासनांचा दररोज करा सराव
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांचा दावा: विधानसभेची दहीहंडी आमच्याच हातात
नवीन कार खरेदीवर सवलत: जुनी कार स्क्रॅप करण्यावर केंद्र सरकारचा निर्णय