पंचगंगेचं पाणी शहरात शिरलं… शिरोळ तालुक्याला पुराचा धोका
कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेला मुसळधार पावसाचा जोर(city) अजूनही कायम आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून पुराचे पाणी शहरात शिरायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरच्या मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या व्हीनस कॉर्नर परिसरातील चार पैकी तीन रस्त्यांवर पुराचे पाणी आले आहे, त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.
वाहतूक विभागाने पर्यायी मार्गाने वाहतूक(city) वळवण्याची व्यवस्था केली आहे. कोल्हापूर शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. प्रशासनाने तातडीने बचाव आणि पुनर्वसन कार्य सुरू केले आहे. नागरिकांनी पुराच्या पाण्यापासून सावध राहून सुरक्षित स्थळी हलवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा :
देशात १.४० लाख नवउद्यमी नोंदणीकृत; उद्यमशीलतेला प्रोत्साहन
विधानसभेपूर्वी राजकीय वारे फिरले; अजित पवार गटाचा बडा मासा शरद पवारांच्या गळाला
महाराष्ट्रात आणखी 4-5 दिवस कोसळधारा; ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा