प्रेमाच्या बाबतीत फारच लाजाळू असतात ‘या’ जन्मतारखेचे लोक
ज्योतिष शास्त्रात अंक ज्योतिष(astrology) शास्त्राला देखील विशेष महत्त्व आहे. ज्याप्रमाणे व्यक्तीच्या राशीनुसार त्याचा स्वभाव ठरवला जातो त्याचप्रमाणे अंक ज्योतिष शास्त्रानुसार, व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व ओळखता येतं. त्यानुसार, या शास्त्रात 1 ते 9 मूलांक असतात. त्याप्रमाणे मूलांक 1 च्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो ते आज आपण जाणून घेणार आहोत.
अंक ज्योतिष(astrology) शास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. त्यामुळे मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा स्वभाव इतरांपेक्षा फार वेगळा असतो. मूलांक 1 असणारे लोक हे आपल्या दृढ निश्चय आणि नेतृत्वासाठी ओळखले जातात. या जन्मतारखेच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव असल्या कारणाने या जन्मतारखेचे लोक प्रत्येक काम मन लावून करतात.
या जन्मतारखेचे लोक फार प्रामाणिक असतात. तसेच, काही प्रमाणात हे लोक थोडेसे हट्टी आणि अहंकारीसुद्धा असतात. या लोकांमध्ये प्रचंड स्वाभिमान, अहंकार आणि महत्त्वकांक्षा असते. तसेच, सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कोणाच्याही हाताखाली किंवा अधीन राहून हे काम करु शकत नाहीत. आयुष्यात येणाऱ्या संकटांचा अगदी धैर्याने हे लोक सामना करतात. या जन्मतारखेच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असते. मात्र, कधी-कधी हे लोक स्वार्थीही होतात.
मूलांक 1 असणारे लोक फारच लाजाळू स्वभावाचे असतात. हे लोक कधीच आपल्या भावना आपल्या प्रिय व्यक्तीसमोर व्यक्त करत नाहीत. जवळपास या जन्मतारखेच्या लोकांचं अरेंज मॅरेजच होतं. नात्याच्या बाबतीत हे लोक सहसा गोंधळातच असतात. या मूलांकाच्या लोकांचं मूलांक 3, 4, 5, 8 आणि 9 च्या लोकांबरोबर फार पटतं. तसेच, मूलांक 4 असणारे लोक यांच्यासाठी परफेक्ट पार्टनर असतात.
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
पाण्याची भलीमोठी टाकी कोसळून 3 कामगारांचा मृत्यू
ओल्या केसांना तेल लावल्यास ते झपाट्याने वाढतात?
‘तुमची ‘संत्रं’ महिन्यातून एकदा…’, Breast Cancer बद्दल वादग्रस्त विधान; युवराज सिंग अडचणीत