पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?, मोठी बातमी आली समोर

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या(Petrol-diesel) किंमतीत मोठी घसरण झाली असून, तीन वर्षांतील सर्वात नीचांकी स्तरावर पोहोचल्या आहेत. ब्रेंट क्रूड 69.76 डॉलर प्रति बॅरल, तर WTI क्रूड 66.77 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. यामुळे भारतात लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलाच्या घसरणीची कारणे

  • ओपेक (OPEC) आणि अमेरिका उत्पादन वाढवणार – एप्रिलपासून ओपेक देश आणि अमेरिका कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवत आहेत.
  • चीन व इतर देशांच्या व्यापार युद्धाचा परिणाम – चीन आणि इतर अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार तणाव वाढल्याने मागणी कमी झाली आहे.
  • रशियन क्रूडचे पुनर्वितरण – भारताने रशियन क्रूडचे रूपांतर करून इंधन स्वरूपात युरोप व G-7 देशांमध्ये निर्यात केले आहे.

पेट्रोल स्वस्त होणार?
सीआरईए च्या अहवालानुसार, दुसऱ्या तिमाहीत कच्च्या तेलाचे(Petrol-diesel) दर 60 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली येऊ शकतात. जर हा अंदाज खरा ठरला, तर भारतात इंधन दर कमी होऊ शकतात.

सरकारी तेल कंपन्यांनी आज सर्व महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. मात्र, कच्च्या तेलाच्या घसरणीचा परिणाम लवकरच दिसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

होळीला बनतोय ‘हा’ जबरदस्त संयोग! ‘या’ 3 राशींवर पैशांचा पाऊस पडणार…

अंगणवाडी सेविकांना खूशखबर! मिळणार 1 कोटी 92 लाख रुपयांचा प्रोत्साहन भत्ता..

पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या! राज्यात एकाचवेळी घेण्यात येणार वार्षिक परीक्षा