‘पिक्चर अभी बाकी है’; युगेंद्र पवारांची मोठी मागणी, अजित पवार अडचणीत?
लोकसभेप्रमाणे राज्यातील विधानसभा(political news) निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी आणि पवार विरूद्ध अशी लढत झाली. या बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलं होतं.
बारामती मतदारसंघात पवार विरूद्ध पवार लढतीत अजित पवारांचा (political news) विक्रमी मतांनी विजय झाला तर युगेंद्र पवारांचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर आता युगेंद्र पवारांनी मत पडताळणीसाठी अर्ज केला आहे. फेरमतमोजणीसाठी लागणारी रक्कमसुद्धा भरली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये पाच टक्के ईव्हीएमची फेरमतमोजणी होणार आहे, असे युगेंद्र पवार
निवडणुकीत अजित पवारांना 1,96,640 तर युगेंद्र पवारांना 80,458 इतकी मते मिळाली आहेत. अजित पवार 1,16,182 मतांनी विजयी झाले आहेत. अजित पवारांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पडलेली तशीच रेकॉर्डब्रेक मते मिळाली आहेत.
युगेंद्र पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली आहे. पुणे जिल्ह्यातील 11 मतदारसंघांमधील 11 पराभूत उमेदवारांनी मत पडताळणीसाठी अर्ज केला आहे.
शिरूरमधील अशोक पवार, बारामतीतील युगेंद्र पवार, हडपरसमधील प्रशांत जगताप, चिंचवडमधील राहुल कलाटे, खडकवासलामधील सचिन दोडके, पर्वतीमधील अश्विनी कदम, भोसरीमधील अजित गव्हाणे, तर दौंडमधील रमेश थोरात यांचा समावेश आहे.
हेही वाचा :
दीपक केसरकर एकनाथ शिंदेंना भेटायला गेले अन् भेट न होताच परतले
CM पदाच्या चर्चेत नवा ट्विस्ट! भाजपाच्या ‘या’ आमदाराच्या नावाची अचानक चर्चा
अर्रर्र! भर रस्त्यात विद्यार्थीनींमध्ये जोरदार राडा; एकमेकींना धु, धु धुतले, VIDEO व्हायरल