खळबळजनक! PM मोदींच्या विमानाला दहशतवादी हल्ल्याची धमकी

पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आलीय. अमेरिका दौऱ्यापूर्वी पीएम मोदींच्या विमानाला दहशतवादी हल्ल्याची(attack) धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी त्यांच्या विमानावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारा फोन आला होता. मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला मिळालेल्या या धमकीच्या फोनमध्ये पंतप्रधानांच्या विमानावर दहशतवादी हल्ला करणार, असा दावा करण्यात आला होता.

या धमकीची दखल घेत पोलिसांनी तात्काळ संबंधित सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली. मोदीच्या दौऱ्यापूर्वी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली, अशी माहिती वृत्तसंस्थाय एएनआयने दिलीय. मुंबई पोलिसांनी एका निवेदनात म्हटलंय की, ’11 फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी अधिकृत परदेश दौऱ्यावर असल्याने दहशतवादी त्यांच्या विमानावर हल्ला करू शकतात, असा इशारा देण्यात आला होता. याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी इतर एजन्सींना माहिती दिली आणि तपास सुरू केला.
पंतप्रधान मोदींनाच धमकी(attack) दिल्याने मोठी खळबळ उडाली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलीसांनी तपास यंत्रणा वेगात फिरवली. कोणी फोन केला, याचा तपास देखील जलद गतीने सुरू केला होता. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या कॉलमागील व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. संशयित व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे आढळून आलंय. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

पंतप्रधान मोदी फ्रान्स आणि अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. मोदींच्या चार दिवसांच्या दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान मोदी आज अमेरिकेत पोहोचणार आहेत. फ्रान्समध्ये पोहोचल्यानंतर भारतीय समुदायाकडून मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. पॅरिसमध्ये एआय अॅक्शन समिट आणि 14व्या भारत-फ्रान्स सीईओ फोरमचे सह-अध्यक्षपद भूषवले.
पंतप्रधान मोदींनी पॅरिसमध्ये झालेल्या एआय अॅक्शन समिटच्या वेळी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची भेट घेतली. त्यावेळी मोदींनी एआय भारतात आणणाऱ्या अविश्वसनीय संधींबद्दल चर्चा केली. भारतीय वंशाच्या अल्फाबेट इंकच्या सीईओंनी देशाच्या ‘डिजिटल परिवर्तनावर’ गुगल आणि भारत एकत्र कसे काम करू शकतात, यावरही चर्चा केली.
हेही वाचा :
10 वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज
कोण आहे ती मुलगी जिच्यासाठी विराट कोहलीने भेदली सुरक्षाव्यवस्था, सर्वांसमोर मिठीत घेतलं
भावानेच केला बहिणीचा घात! प्रेमप्रकरणामुळे कापलं मुंडक अन् गावभर घेऊन फिरू लागला Viral Video