पंतप्रधान मोदी जळगावात ‘लखपती दीदीं’शी संवाद साधणार; भव्य मेळाव्याची तयारी अंतिम टप्यात

पंतप्रधान(Minister) नरेंद्र मोदी आज, रविवारी जळगाव विमानतळ परिसरात ‘लखपती दीदीं’च्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी २२ एकर क्षेत्रावर भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे.

प्रशासनाने भर पावसात मेळाव्याच्या तयारीसाठी मोठी कसरत केली आहे, आणि सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी संपूर्ण विमानतळ परिसरावर केंद्रीय यंत्रणांची करडी नजर राहणार आहे.

रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत होणाऱ्या या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक शुक्रवारी रात्रीच जळगावमध्ये दाखल झाले आहे. शनिवारी सकाळी ७ वाजल्यापासून मेळावा परिसरात खासगी व्यक्तींना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींसह केंद्र आणि राज्य मंत्रीमंडळातील अनेक वरिष्ठ सदस्य या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. मेळाव्याच्या स्थळी ग्रामीण जीवनशैलीवर आधारित एक खास वस्ती निर्माण करण्यात आली आहे. या वस्तीतील झोपड्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती, कलाकृती आणि इतर उपक्रमांचे पंतप्रधानांसमक्ष सादरीकरण केले जाणार आहे.

हेही वाचा :

सकाळी हेल्दी आणि टेस्टी ड्रिंक्सचा समावेश केल्यास दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवणे सोपे होते..

“साबुदाण्याच्या एका मिश्रणासह तयार करा उपवासासाठी स्वादिष्ट आणि खमंग पदार्थ!”

टेलिग्रामचे CEO पावेल दुरोव पॅरिस विमानतळावर अटकेत; काय आहे कारण?