“सहा महिन्यात पंतप्रधान मोदींचे सरकार पडणार”, राजकीय नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची(political leader) रणधुमाळी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व भाजप नेते जोरदार प्रचार करत आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आणि पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे भाषणांमधून नेत्यांचे जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आता महाविकास आघाडीच्या नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रातील सरकार सहा महिन्यांमध्ये पडणार असल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभा (political leader)निवडणूकीचा जोरदार प्रचार केला जात आहे. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी जोरदार राजकीय टीका टिप्पणी केली. संजय राऊत म्हणाले की, संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्रातील निवडणुकांकडे लागलं आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदी, अमित शाहा यांसह त्यांचे केंद्रीय मंत्रिमंडळ हे संपूर्ण राज्यात फिरतंय.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात सरकार निवडून येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहांना महाराष्ट्र भीक घालत नाही. महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपचा पराभव होणार आहे. राज्यात महाविकासआघाडीचं सरकार येताच पुढच्या सहा महिन्यात नरेंद्र मोदींचे सरकार डळमळीत होईल, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत देशाला मागे ओढण्याचे काम केले आहे. मोदींनी नवीन काहीही केलं नाही. आता शिवतीर्थावर सभा तर त्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीला स्मरुन सांगावं की महाराष्ट्र तोडण्यासाठी मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी त्यांनी शिवसेना तोडली की नाही? हे त्यांनी त्यांच्या छातीवर हात ठेवून सांगावं. त्यांच्यात तेवढी हिंमत असेल तर आम्ही पाहू,” असे थेट आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.
पुढे संजय राऊत यांनी महायुतीच्या सततच्या जाहिरातींवर देखील निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, “भाजप हा जाहिरातीवर तारलेला पक्ष आहे. जाहिरातबाजीवर खर्च करुन 2014 या वर्षी नरेंद्र मोदी हे सत्तेवर आलेट. खोट्या जाहिराती, खोटी प्रसिद्धी हे सर्व त्यावेळी केलं. 2014 मध्ये ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जाहिराती केल्या होत्या. आता दहा वर्षांनी आपण जर पाहिलं, तर त्यांनी फार मोठी क्रांती केली किंवा त्यांनी आधुनिक हिंदुस्थान घडवलाय, असं काही वाटत नाही,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा :
संजू सॅमसनचे वडील धोनी-कोहली, रोहित आणि द्रविडवर भडकले
लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गर्भवती महिलेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला आग, भीषण स्फोटात वाहनाचे तुकडे