प्रकाश आंबेडकर यांची छगन भुजबळांना खुले आमंत्रण..

नाशिक: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (political)यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना खुली ऑफर देत, त्यांना आपल्या आघाडीत सामील होण्याचे आवाहन केले आहे. आंबेडकर यांनी सोमवारी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, “छगन भुजबळ हे शंभर टक्के ओबीसीवादी आहेत, पण त्यांच्या पक्षाची भूमिका ओबीसींना न्याय देण्याची आहे का, याचा खुलासा त्यांच्याकडूनच होऊ शकतो.”

याच वेळी, आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही सरकारवर जोरदार टीका केली. “मनोज जरांगे यांनी विधानसभेत मराठा उमेदवार उभे करण्याचा निर्णय २९ ऑगस्टला घेऊ असे जाहीर केले आहे, आणि त्यांनी तसेच करावे,” असे आव्हान आंबेडकर यांनी दिले. त्यांनी आरोप केला की, “ओबीसी आणि मराठा समाजाच्या दुराव्याची जबाबदारी शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांसारख्या नेत्यांवर आहे.”

आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नव्या आघाडीचे नामकरण एक सप्टेंबरला होणार असल्याची घोषणाही केली. या बैठकीत आदिवासी आणि ओबीसी संघटनांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. आंबेडकर यांनी म्हटले की, “आदिवासींना फक्त आरक्षित मतदारसंघांमध्येच नव्हे, तर इतर मतदारसंघांमध्येही उमेदवारी मिळायला हवी.”

आंबेडकर यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत टीका केली की, “हे सरकार भ्रष्टाचाराचे माहेरघर आहे, आणि अटल सेतू आणि समृद्धी महामार्गावरही खड्डे पडत आहेत. सरकार महिलांना सुरक्षितता देण्यास असमर्थ आहे.”

राजकीय पक्षांवर द्वेष पसरवून समाजात मानसिकता बिघडवण्याचा आरोप करत, आंबेडकर यांनी जनतेला एकत्र येण्याचे आवाहन केले.

हेही वाचा :

कोहलीने कसोटी संघाचे नेतृत्व आणखी काही काळ सांभाळायला हवे होते” – माजी कोच संजय बांगर

टेलिग्रामवर बंदीची शक्यता? दुरोवच्या अटकेनंतर भारत सरकारच्या हालचालींमुळे चिंता

मैत्रिणीवर विश्वासघात: मैत्रिणीकडून फोटो मागण्याचे कारण धक्कादायक.