राज्य सरकारवर प्रणिती शिंदेंचा तीव्र हल्ला: “जर मुख्यमंत्री असे म्हणत असतील तर, जनतेने कोणाकडे पाहायचे?”

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने (political)राजकीय वातावरण तापले आहे. अवघ्या आठ महिन्यांत पुतळा कोसळल्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. या घटनेने मालवणमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून ठाकरे गट आणि राणे समर्थक यांच्यातील संघर्षाची ठिणगी पेटली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळा कोसळण्याचे कारण जोरदार वारे असल्याचे सांगितले होते. यावर खासदार प्रणिती शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजकोट किल्ल्यावर झालेल्या या घटनेला लाजिरवाणी घटना असे संबोधत प्रणिती शिंदे यांनी सरकारवर टीका केली. “जर मुख्यमंत्री असे म्हणत असतील की जोरदार वारे वाहत असल्याने पुतळा कोसळला, तर जनतेने कोणाकडे पाहायचे?” असे सवाल त्यांनी उपस्थित केला.

बदलापूर घटनेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि सरकारला कडक शब्दांत सुनावले. “सरकार एकीकडे पुतळा कोसळण्यामागे वारा आणि बदलापूर घटनेत राजकारणाचा उल्लेख करत आहे. आता त्यांच्या अपयशाची उलटी गिनती सुरू झाली आहे,” असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.

या घटनेमुळे मालवणमध्ये ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असून पुतळा कोसळल्यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे घटनास्थळी पोहोचले. परंतु, भाजप आणि राणे समर्थकांच्या विरोधात ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये मोठा संघर्ष झाला. या तणावामुळे मालवणमधील वातावरण चांगलेच तापले आहे.

हेही वाचा:

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ‘या’ तारखेला पाकिस्तानशी सामना

“महिला अत्याचारांना आता पूर्णविराम द्या” : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आवाहन

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पतनानंतर राजकीय वादंग, नौदल तपास सुरू, काँग्रेस आक्रमक