कांदा प्रश्नावर पंतप्रधान मोदींना घरचा आहेर… भाजप नेत्यांनी टोचले कान !

केंद्रातील भाजप सरकारने नाफेड मार्फत पाच लाख टन कांदा खरेदीचा निर्णय(ears) घेतला आहे. त्याचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होण्याची शक्यता नाही. याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनीच सरकारला घरचा आहेर दिला आहे. केंद्र सरकारने धोरण ठरवितांना शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे.

केंद्रानं कांदा निर्यातीबाबत शेतकऱ्यांच्या(ears) हिताची भूमिका घेतली नाही, तर लोकसभेपेक्षा मोठा फटका विधानसभा निवडणुकीत बसेल, असा थेट इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे. केंद्रानं कांद्यावरील निर्यातबंदीवरील अटी शर्ती दूर करून कायमस्वरूपी ठोस निर्यात धोरण आखावे, अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, ४ मेला केंद्रानं कांद्यावरील निर्यातबंदी उठवली होती. तरी निर्यात शुल्क आणि निर्यात मूल्याच्या अटी शर्तीमुळे कांदा निर्यात घसरली. यंदाच्या वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत अवघे २५,६२९ टन कांदा निर्यात झाला आहे.

केंद्राच्या धरसोड कांदा निर्यात धोरणामुळे जागतिक बाजारात मागणी असूनही कांदा निर्यातीला फटका बसत असल्याचं दिसत आहे. निर्यातीवरील अटी शर्ती आणि धरसोड धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कोट्यावधींच नुकसान देखील झालं आहे.

हेही वाचा :

वयाच्या ५० व्या वर्षीही मलायका अरोरा इतकी फिट कशी?, VIDEO बघून व्हाल आश्चर्यचकित!

गृहिणीचे किचन बजेट बिघडले! पावसाचा जोर ओसरताच पालेभाज्या, फळभाज्या महागल्या

शिवसेना फोडणं हे मुघलानंतरचं महाराष्ट्रातील सर्वात मोठं आक्रमण – संजय राऊत