हॉलिवूड सिनेमाच्या शूटिंगमध्ये पुन्हा रक्तबंबाळ झाली प्रियांका
मुंबई- ग्लोबल अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या चर्चेत आहे. ती ऑस्ट्रेलियात तिच्या(movie) आगामी सिनेमाचे शूटिंग करत आहे. यावेळी शूटिंगला तिचे कुटुंबही सोबत असल्यामुळे ती वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्याचा समतोल राखताना दिसते. प्रियांका सध्या तिच्या ‘द ब्लफ’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. प्रियांकाने नुकतीच तिच्या पती आणि मुलीसोबतचे फोटो शेअर केले. याशिवाय तिने शूटिंगदरम्यान झालेल्या दुखापतीचे फोटोही तिने शेअर केले. ते पाहुन चाहत्यांची चिंता वाढली आहे.
प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर निक(movie) जोनाससोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने त्याला आपल्या मिठीत घेतले आहे. दोघेही तलावासमोर एकत्र पोज देत आहेत. निकने आपल्या लाडक्या बोयकोला जवळ धरुन पोज दिली आहे. त्यानंतर मालतीसोबतचा एक फोटो आहे. पुढे प्रियांकाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिच्या पायाला झालेल्या जखमा दाखवतेय. प्रियांकाने आपल्या आईसोबतचेही काही फोटो शेअर केले.
निक जोनासने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो आपली मुलगी मालतीला मिठी मारताना दिसतोय. पुढच्या फोटोत, तो तिचा हात धरून रस्त्यावर चालत आहे आणि शेवटचा फोटोत मालती आणि निकसोबत प्रियांकादेखील आहे.
प्रियांका सध्या ऑस्ट्रेलियात तिच्या आगामी ‘द ब्लफ’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. शूटिंगदरम्यान तिची मुलगी मालतीही सोबत होती. प्रियांका अनेकदा तिच्या सोशल मीडिया हॅण्डल द्वारे वेगवेगळे अपडेट शेअर करत असते. नुकतीच जेव्हा तिला दुखापत झाली होती तेव्हा तिने वेदना कमी होण्यासाठी पायाला लसूण चोळलेला. कमेंटमध्या चाहते तिला वेगवेगळे उपाय सांगत आहेत.
‘द ब्लफ’ या चित्रपटात कार्ल अर्बन, इस्माईल क्रुझ कॉर्डोव्हा, सफिया ओकले-ग्रीन आणि वेदांतेन नायडू यांच्याही भूमिका आहेत. प्रियांकाच्या चोप्राच्या बॉलिवूड कामाबद्दल बोलायचे झाल्यास , ती फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ मध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे. चाहते तिच्या या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे.
हेही वाचा :
टाटांचा क्रांतिकारी निर्णय, कंपन्यांमध्ये लागू होणार २५ टक्के आरक्षण
महावितरणकडून सामान्य ग्राहकांना दिलासा; स्मार्ट मीटरसंदर्भात घेतला मोठा निर्णय
शेजारणीसाठी पुरुष बनली विवाहित महिला; केलं असं कृत्य की नवराही पळाला