‘पुष्पा 2 द रुल’चं पहिलं गाणं ‘पुष्पा पुष्पा’ चा प्रोमो प्रदर्शित

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या(promotions) ‘पुष्पा 2’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. या चित्रपटातील छोटी अपडेट देखील प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवत आहे. या सगळ्यात अल्लू अर्जुन आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याच्या चाहत्याला एक भेट दिली आहे. त्यांनी या चित्रपटाच्या गाण्याची एक झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. या गाण्याची प्रेक्षक घोषणा झाल्यापासून प्रतिक्षा करत होते. तितक्यात एक झलक समोर आल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद झाला आहे.

‘पुष्पा 2: द रुल’च्या निर्मात्यांनी आणि अल्लू अर्जुननं (promotions)त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पहिल्या सिंगल ‘पुष्पा पुष्पा’ गाण्याचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं अल्लू अर्जुनच्या पुष्पा राजच्या पात्रासाठी कमालीचं सुंदर आहे, यात शंका नाही. या आधी देखील ‘पुष्पा’ या पहिल्या भागासाठी देखील देवी श्री प्रसादनं संगीत दिलं होतं. त्या चित्रपटातील सगळी गाणी ही खूप हिट झाली होती. अल्लू अर्जुनच्या ‘श्रीवल्ली’, रश्मिका मंदानाच्या ‘सामी-सामी’ आणि समांथा रुथ प्रभूच्या ‘उ अंटावा’ या गाण्यांनी सगळ्यांची मने जिंकली.

‘पुष्पा: द राईज’चं संगीत जगभर लोकप्रिय झाल्यानंतर आता या गाण्याची मज्जा अनुभवण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. ‘पुष्पा पुष्पा’ हे पूर्ण गाणं 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. आता फक्त प्रोमो बघून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रेक्षकांनी या बद्दल उत्सुकता व्यक्त केली असून या बद्दल अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.

दरम्यान, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा ‘पुष्पा 2’ हा चित्रपट यंदाच्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शनाआधी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी निर्माते मधून मधून असे छोटे-छोटे प्रोमो शेअर करताना दिसत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून 4 महिने आहेत. त्या आधी निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनची तयारी सुरु केली आहे.

काही दिवसांपूर्वीच अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या चित्रपटाचा पहिला टीझर शेअर करण्यात आला आहे. चित्रपटाचा टीझर पाहून सगळ्या प्रेक्षकांना आनंद झाला त्यात सगळ्यांना अल्लू अर्जुनचा हटके अंदाज पाहायला मिळाला.

हेही वाचा :

IPL मॅचच्या बेकायदेशीर स्ट्रीमिंगप्रकरणी तमन्ना भाटिया अडचणीत

धक्कादायक! भाजपच्या विद्यमान खासदाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मी बाप होणार होतो आणि…’ लेकीच्या जन्माचा तो क्षण आठवून रोहित का व्यक्त करतो खंत?