Pushpa 2 ची क्रेज की वेडेपणा? अल्लू अर्जुनसमोरच लाठीचार्ज, चेंगराचेंगरीत अनेक जखमी; Video
अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित ‘पुष्पा 2’ चित्रपट(new movie)अखेर प्रदर्शित झाला आहे. मात्र या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये असलेल्या उत्साहाचा एक विद्रुप चेहरा बुधवारी हैदराबादमध्ये पाहायला मिळाला. हैदराबादमधील आरटीसी एक्स रोडवर अल्लू अर्जुन या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहचला होता.
मात्र त्याला पाहण्यासाठी एवढी गर्दी झाली की या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी अल्लू अर्जुन(new movie) तिथे आल्याने एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाल्याने काही जण जखणी झाली. या साऱ्या घटनाक्रमाचा व्हिडीओ आता समोर आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागल्याचंही या व्हिडीओत दिसून येत आहे.
हैदराबादमधील संध्या थेअटर येथील एक व्हिडीओ बुधवारी समोर आला. या थेअरटरमध्ये अल्लू अर्जुन स्वत: चित्रपट पाहण्यासाठी येणार असल्याची माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि प्रेक्षकांनी या ठिकाणी एकच गर्दी केली. ‘पुष्पा 2’ हा चित्रपट पाहायला येणाऱ्या आपल्या आवडत्या सुपरस्टारची एक झलक पाहता यावी म्हणून जागा मिळेल तिथे अल्लू अर्जुनेच चाहते चढून बसले होते. गर्दी एवढी वाढली की त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
अखेर या गर्दीचे आभार मानन्यासाठी अल्लू अर्जुन समोर आला आणि त्याला जवळून पाहण्यासाठी सर्वजच जण त्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करु लागले. याच दरम्यान चेंगराचेंगरी झाली. नंतर अल्लू अर्जुन या आपल्या गाडीमध्ये बसून बाहेर निघतानाही शेकडो चाहत्यांनी या गाडीभोवती गर्दी केल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
#WATCH | Telangana: Actor Allu Arjun arrives at Sandhya theatre in Hyderabad for the premiere show of his film 'Pushpa 2: The Rule'. pic.twitter.com/Pkzra7Y1ja
— ANI (@ANI) December 4, 2024
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ हा प्रदर्शनापासूनच वादात सापडला आहे. हैदराबादमध्ये पहाटे 3 वाजता ‘पुष्पा 2’चे शो लावले जात आहेत. यामुळे नाराज झालेल्या कन्नड चित्रपट निर्माते असोसिएशनने बंगळुरु जिल्हा आयुक्तांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. नियमांनुसार चित्रपट पहाटे सहाच्या आधी सिनेमागृहांमध्ये दाखवता येत नाही.
#WATCH | Telangana: Fans of actor Allu Arjun thronged the Sandhya theatre in Hyderabad ahead of the premiere show of his film 'Pushpa 2: The Rule' tonight. Police resorted to mild lathicharge to control the crowd. pic.twitter.com/jhRvfB7D3m
— ANI (@ANI) December 4, 2024
मात्र असं असतानाही ‘पुष्पा 2’चे शो पहाटे तीन वाजता ठेवण्यात आले आहेत. तसेच ‘पुष्पा 2’च्या तिकीटदरांवरही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तिकीटाचे दर 500, 1000 आणि 1500 रुपये असे ठेवण्यात आले आहेत. एवढे दर ठेवणे कायद्याच्याविरोधात असल्याचं निर्मात्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
हेही वाचा :
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार का? अजित पवारांनी केलं मोठं विधान
फडणवीसांना शुभेच्छा देणार पण, पहिल्या सारखं लफड्यात पडायचं नाही; जरांगेंनी सांगून टाकलं…
संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा मऊसूत पनीर-बटाटा डोनट, लहान मुलं होतील खुश