R Ashwin ने निवृत्ती जाहीर केली कोणाचे मेसेज आणि फोन आले खास स्क्रीनशॉट शेअर केला

 भारताचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (international)निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.  सध्या ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्याअंती अश्विनने निवृत्तीची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला. टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी त्याला भावनिक निरोप दिला आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर अनेक माजी खेळाडूंनी देखील अश्विनला सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. गुरुवारी अश्विन भारतात परतला, यावेळी सोशल मीडियावर एक स्किनशॉट पोस्ट करून त्याला निवृत्तीनंतर कोणकोणत्या व्यक्तींचे फोन आले याबाबत सांगितले.

2010 मध्ये आर अश्विनने भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. अश्विन तब्बल 14 वर्ष भारतासाठी खेळला यादरम्यान त्याने 106 टेस्ट, 116 वनडे आणि 65 टी 20 सामने खेळले आहेत. अश्विनने त्याची मोबाईल कॉल हिस्ट्रीचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर शेअर केला.आर अश्विनने स्क्रीन शॉट शेअर करत लिहिले की, “भारतीय क्रिकेटपटू म्हणून माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी माझ्याकडे असा स्मार्ट फोन आणि कॉल लॉग असेल असे मला 25 वर्षांपूर्वी कोणी सांगितले असते तर मला हृदयविकाराचा झटका आला असता. धन्यवाद सचिन सर आणि कपिल पाजी”. कॉल लॉगमध्ये दिसते की भारताला पहिल्यांदा (international)वर्ल्ड कप जिंकवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी अश्विनला व्हाट्सएप कॉल केला होता. तर भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने फेसटाइम ऑडियो कॉल केला होता. 

आर अश्विनने 2010 मध्ये श्रीलंके विरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याचं एकूण क्रिकेट करिअर हे 14 वर्षांचं होतं. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल आणि देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे. अनिल कुंबळे यांच्यानंतर सर्वाधिक टेस्ट विकेट्स घेणारा आर अश्विन हा दुसरा भारतीय गोलंदाज आहे. रविचंद्रन अश्विन या भारताच्या(international) स्टार स्पिनरने क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये एकूण  765 विकेट्स घेतले आहेत. आर अश्विनने 106 टेस्टमध्ये 537 विकेट्स आणि 3503 धावा केल्या आहेत. तर वनडेमध्ये त्याने 116 सामन्यात 156 विकेट्स आणि 707 धावा केल्या आहेत. टी 20 मध्ये अश्विनने 65 सामन्यात 72 आणि 31 धावा केल्या आहेत. 

हेही वाचा :

पाणी प्रदूषणामुळे मिरजेतील गणेश तलावात ६०० किलो मासे मृत

हेल्मेट सक्तीबाबत महिलेचे विचित्र विधान; ऐकून पोलीसही झाले हैराण

थरकाप उडवणारी घटना; १५ वर्षीय मुलाच्या शरीराचे १७ तुकडे करून पुरले

केसांसोबत खिशाला कात्री लागणार