आर माधवनने पान मसाला ब्रँडच्या ब्रँड ॲम्बेसेडर होण्यासाठीची ऑफर नाकारली: प्रामाणिकपणाचा आदर्श
बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता आर माधवन (actor)आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जातो. अलीकडेच, त्याला एक मोठ्या पान मसाला ब्रँडकडून ब्रँड ॲम्बेसेडर होण्यासाठी आकर्षक ऑफर प्राप्त झाली होती. परंतु, माधवनने आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहून आणि प्रेक्षकांप्रती आपली जबाबदारी लक्षात घेऊन ही ऑफर नाकारली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पान मसाला कंपनीने त्यांच्या ब्रँडची पोहोच वाढवण्यासाठी एक प्रसिद्ध चेहरा शोधण्याचा विचार केला होता. माधवनने ऑफर नाकारल्यामुळे, कंपनी अद्याप नवीन चेहऱ्याच्या शोधात आहे. यापूर्वी शाहरुख खान, अक्षय कुमार, महेश बाबू आणि अजय देवगण यांसारख्या सेलिब्रिटींनी पान मसाला ब्रँडचे समर्थन केले होते, परंतु या निर्णयामुळे प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. माधवनने ही ऑफर नाकारून स्पष्ट केले आहे की, त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी न मिळवणाऱ्या ब्रँडशी जोडणे त्याला मान्य नाही.
कामाच्या आघाडीवर, माधवनने 2024ची सुरुवात ‘शैतान’ या चित्रपटाने केली, ज्याला प्रचंड प्रेम मिळाले. त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये ‘धुरंधर’, ‘दे दे प्यार दे 2’, आणि ‘शंकरन’ यांचा समावेश आहे. तमिळ चित्रपट क्षेत्रात ‘टेस्ट’ आणि ‘अधिरष्टसाली’ यासह त्याचे आगामी चित्रपट आहेत. सध्या, माधवन लंडनमध्ये ‘ब्रिज’ नावाच्या प्रोजेक्टसाठी शूटिंग करत आहे, जो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
हेही वाचा:
‘लाडकी बहिणी’ योजनेत एक कोटी महिला लाभार्थी, सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती
फडणवीस म्हणतात: “पक्ष सांगेल तेव्हा दिल्लीला जाईन…
उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका: ‘हात लावीन तिथे सत्यानाश’