राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी; एक दरवाजा बंद

राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर थोडासा कमी झाला असून (dam)नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. आज सकाळी ५ वाजता खुला झालेला क्रमांक एकचा स्वयंचलित दरवाजा दुपारी १ वाजता बंद करण्यात आला आहे. सध्या धरणाचे पाच दरवाजे खुले असून या दरवाजातून ७१४० क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. पॉवर हाऊसमधून १५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग (dam)सुरू आहे, त्यामुळे एकूण ८६४० क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

सध्या धरणाचे ३, ४, ५, ६, आणि ७ क्रमांकाचे दरवाजे खुले असून या दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे, (dam)परंतु सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि पूरस्थितीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा :

राज्यातील युवकांसाठी खुशखबर! सर्व शासकीय कार्यालयात इंटर्नशिपची संधी उपलब्ध

जितेंद्र आव्हाड यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले, “राजकारण म्हणजे चित्रपट नव्हे…”

पत्नीची अनंत प्रतीक्षा: ‘तुला भेटायला येतो’ अशी चिठ्ठी आली, पण तो तिरंग्यात गुंडाळून आढळला