राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, ‘या’ जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी जाहीर

राज्यात परतीच्या पावसाने(rain) धुमाकूळ घातला आहे. जवळपास 15 दिवसांच्या ब्रेकनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई शहराला तर पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. येथे वादळी वाऱ्याचा पाऊस होत आहे. पावसामुळे मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनचा वेग मंदावला आहे. आज 26 सप्टेंबररोजी देखील पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पाऊस(rain) बरसत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईसह, ठाणे, पालघर, पिंपरी-चिंडवड परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिमुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

अतिवृष्टीमुळे ठाण्यातील पहिली ते 12 वी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते. याचा विचार करता ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना आज 26 सप्टेंबररोजी सुट्टी जाहीर केली आहे.

पुण्यात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जारी करण्यात आली आहे. हवामान विभागाने आज मुंबईला वादळ आणि विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुण्याला देखील आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यामध्येही मुसळधार पाऊस सुरू असून पालघरला आज, गुरुवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

“भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला 26 सप्टेंबर 2024 सकाळी 8:30 पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना गुरूवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे”, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचा:

‘मूर्ख तू नाहीस, तर मी आहे,’ …अन् संतापलेल्या धोनीने घातल्या शिव्या

आज जुळून आला गुरु पुष्य योग; ‘या’ 5 राशींचं भाग्य उजळणार!

अरे बापरे, तो आला आणि तिला चक्क…माकडाच्या कृत्याचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक