रजनीकांतच्या लेकीचा आणि धनुषच्या विवाहाचा शेवट: 18 वर्षांच्या घेतला घटस्फोट
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतच्या लेकीचा आणि तमिळचा लोकप्रीय अभिनेता धनुष आता कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत. १८ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता.त्यांचा हा अर्ज मंजूर झाला असून धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांतचा(divorce) विभक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. धनुष आणि ऐश्वर्याला दोन मुलं आहेत. काही वर्षांपूर्वीच या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. पण आता विभक्त होण्याची औपचारिक प्रक्रीया त्यांनी पूर्ण केली आहे. दोन्ही मुलांना एकत्र वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय.
धनुष आणि ऐश्वर्याच्या चाहत्यांना हे त्यांच्या (divorce)विभक्त होण्याच्या निर्णयाचा धक्का बसला होता.पण दोघेही आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील बदलांना एकदम शांतपणे स्वीकारत आहेत. धनुष अजूनही फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे, तर ऐश्वर्यासुद्धा आपल्या करिअरमध्ये यशस्वीपणे काम करत आहे. ऐर्श्वर्या चित्रपट निर्माती म्हणून दक्षिण चित्रपटसृष्टीत सक्रीय आहे.
सुपरस्टार रजनीकांत यांच्या मोठ्या मुलीची, ऐश्वर्या आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता धनुष यांच्या १८ वर्षांच्या संसाराला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दोघांनी वेगळं होण्यासाठी २०२२ मध्ये अर्ज केला होता, जो आता मंजूर झाला आहे. चेन्नई कौटुंबिक न्यायालयाने या जोडप्याला अधिकृत घटस्फोट मंजूर केला आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनात काही मतभेद निर्माण झाल्यामुळे त्यांनी हा कठोर निर्णय घेतला होता. अनेक वर्षे एकत्र संसार केल्यानंतर, या जोडप्यानं आता वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. वैयक्तिक आयुष्याचा आदर करण्याचं आवाहन केलं जात आहे. धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचं 2004 मध्ये लग्न झालं. आता घटस्फोट झाला असला तरी त्यांच्या दोन्ही मुलांना ते एकत्र वाढवणार आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट्समधून, त्यांच्या मुलांसोबत धनुष आणि ऐश्वर्या दोघेही कायम वेळ घालवतानाचे फोटो शेअर करत असतात.
धनुषने एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांची पहिली भेट एका कार्यक्रमाच्या दरम्यान झाली होती, जिथे त्याच्या कुटुंबासोबत ऐश्वर्या आणि तिची बहीण सौंदर्यादेखील उपस्थित होत्या. पहिल्या भेटीनंतर ऐश्वर्यानं धनुषला बुके पाठवत शुभेच्छा दिल्या होत्या.“गुड वर्क, कीप इन टच” या वाक्यानं धनुषला प्रेरित केलं होतं. त्यानंतर त्याच्यांत भेटीगाठी वाढल्या. या भेटींमधून त्यांचं नातं फुललं. त्यांच्या कुटुंबांनी दोघांच्या लग्नाला संमती दिली आणि रजनीकांत यांच्या घरी मोठ्या धुमधडाक्यात त्यांचा विवाहसोहळा पार पडला.
हेही वाचा :
महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम जनतेच्या मतांनीच भाजप प्रदेशाध्यक्ष यांचे विधान
भाजपच्या या उमेदवार ला मिळणार मोठी जबाबदारी पक्षात हालचालींना वेग
चहा प्रेमींसाठी नवीन अनुभव: घ्या गुलाब चहाचा आस्वाद