तिसऱ्यांदा मोडलं राखी सावंतचं लग्न, प्रपोज करणाऱ्या अभिनेत्याचा लग्नाला नकार
‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतच्या आयुष्यातील ड्रामा काही संपण्याचं नाव घेत नाही. राखी सावंत नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता सध्या ती लग्नामुळे(marriage) चर्चेत आली आहे. राखी सांवत तिसऱ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत होती. मात्र, लग्न होण्याआधी हे लग्न मोडलं आहे. राखी सावंतच्या आयुष्याची घडी बसण्याआधीच पुन्हा एकदा फिस्कटली आहे. राखीला प्रपोज करणाऱ्या अभिनेत्याने लग्नाला नकार दिला आहे.
पाकिस्तानी अभिनेना डोडी खान याने राखी सावंतला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. त्यानंतर ते लवकरच पाकिस्तान लग्न करणार असं सांगितलं जात होतं. पण, आता या अभिनेत्याने लग्नाला(marriage) नकार दिला आहे. पाकिस्तानी अभिनेता-मॉडेल डोडी खानने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत राखीसोबत लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, आता या अभिनेत्याने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लग्नासाठी नकार दिला आहे. यामुळे राखीच्या आयुष्यात पुन्हा आनंद येणाऱ्या आधीच सर्व काही संपलं आहे. डोडी खानचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेता डोडी खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो राखीचं कौतुक करत आहे, पण त्याने स्पष्ट केले आहे की, तो राखीशी लग्न करणार नाही. व्हिडीओमध्ये डोडीने म्हणाला की, “नमस्कार, भारत आणि पाकिस्तान, मी डोडी खान आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही माझ्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पाहिला असेल, ज्यामध्ये मी राखी सावंतला प्रपोज केलं होतं. तुम्ही पाहिला तो व्हिडीओ अगदी बरोबर आहे. राखीला प्रपोज करण्यामागचं कारण म्हणजे मी तिला खूप चांगलं ओळखतो”.
डोडी पुढे म्हणाला की, “मी तिला जेव्हापासून ओळखतो तेव्हापासूनच तिला देवावर प्रेम करणारा माणूस म्हणून पाहिलं आहे. तिने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. तिने आई-वडील गमावले, त्यांच्या आजारपणात ती त्याच्यासोबत राहिली, जे आजच्या काळात शक्य नाही. एक माणूस तिच्या आयुष्यात आला, त्याने काय केलं हे तुम्हाला माहिती आहे. ती एका मोठ्या मानसिक आघातातून बाहेर पडली, इस्लाम स्वीकारला, उमराह केला आणि फातिमा हे नाव धारण केलं, ही खूप मोठी गोष्ट आहे”.
डोडी म्हणाला की,” मला ती आवडते, म्हणून मी तिला प्रपोज केलं पण मला वाटतं की, लोक ते स्वीकारणार नाहीत. मला खूप मेसेज आणि व्हिडीओ आले, मी इतकी टीका सहन करू शकत नाही. राखी, तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस, खूप प्रिय मैत्रीण आहेस आणि तू नेहमीच राहशील. तू डोडी खानची पत्नी होऊ शकली नाहीस, पण तू पाकिस्तानची सून नक्कीच होशील. मी तुझं लग्न(marriage) माझ्या एका भावाशी करेन आणि मग मी तुझ्या पाठीशी उभा राहीन. त्यानंतर मी लोकांना योग्य उत्तर देईन”.
राखी सावंतने डोडी खानच्या व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. राखी सावंत डोडीच्या व्हिडीओवर रडणारे आणि हृदयद्रावक इमोजी पोस्ट केले आहेत. राखीचा पहिला पती रितेशनेही दोडीच्या व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं आहे की, “राखी, ही तुझी निवड होती, जो स्वतःसाठी भूमिका घेऊ शकत नव्हता, तो तुझी साथ काय देणार?”
हेही वाचा :
आजपासून सुरू होणार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
वादाच्या गदारोळात ‘छावा’ चित्रपटाचे पहिले गाणे रसिकांच्या भेटीला
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या सगळ्यांकडून दंड वसूल केला जाणार